पोलिसांच्या गलथानपणामुळे आरोपीने हातातील बेडीसह ठोकली धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 01:08 IST2017-10-26T01:08:49+5:302017-10-26T01:08:54+5:30
राजगुरुनगर : पोलिसांच्या गलथानपणामुळे आरोपीने हातातील बेडीसह धूम ठोकली. समाधान ऊर्फ सोन्या सुरेश अवताडे देशमुख (वय २०, मूळगाव राठी- विरवडे बुद्रुक, ता. मोहोळ, जि. सोलापूर, सध्या रा. आंबेठाण रोड, चाकण) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांच्या गलथानपणामुळे आरोपीने हातातील बेडीसह ठोकली धूम
राजगुरुनगर : पोलिसांच्या गलथानपणामुळे आरोपीने हातातील बेडीसह धूम ठोकली. समाधान ऊर्फ सोन्या सुरेश अवताडे देशमुख (वय २०, मूळगाव राठी- विरवडे बुद्रुक, ता. मोहोळ, जि. सोलापूर, सध्या रा. आंबेठाण रोड, चाकण) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अवताडे या आरोपीला खेड न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
त्याला येरवडा येथे घेऊन जाताना (दि.२४) रात्री पाऊणे नऊच्या सुमारास चाकण येथील पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या कानपिळे यांच्या पेट्रोलपंपावर आरोपी घेऊन चाललेली पोलीस गाडी इंधन भरण्यासाठी थांबली. आरोपी अवताडे याने गाडीचा दरवाजा उघडून पळ काढला.
पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने पोलिसांच्या तोंडावर हातातील बेडी मारून धूम ठोकली.
२९ एप्रिल २०१६ नीलेश मेदगे
(रा. कडूस, ता खेड ) यांच्यावर आरोपीने कडधे येथे प्राणघातक हल्ला केला होता. गुन्हा घडल्यापासून दीड वर्ष आरोपी फरार होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण (विभाग पुणे ग्रामीण) यांनी फरारी आरोपीला २१ आॅक्टोबर २०१७ ताब्यात घेतले व खेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. खेड पोलिसांनी ओरापीला दोन दिवसांची पोलीस कस्टडी दिली