शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

एड्सबाधितांच्या संख्येत घट, आरोग्य विभागाच्या उपाययोजनांचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 02:45 IST

एड्स रोगाबाबत समाजात चांगली जनजागृती झालेली आहे. त्यामुळे या रोगाचा प्रसार रोखण्यात यश येऊ लागले आहे. शून्य गाठायचा आहे, हे उद्दिष्ट आरोग्य विभागाने डोळ्यांसमोर ठेवले असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.

मंचर : एड्स रोगाबाबत समाजात चांगली जनजागृती झालेली आहे. त्यामुळे या रोगाचा प्रसार रोखण्यात यश येऊ लागले आहे. शून्य गाठायचा आहे, हे उद्दिष्ट आरोग्य विभागाने डोळ्यांसमोर ठेवले असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. मंचर आरोग्य केंद्रात यावर्षी एचआयव्ही रुग्णांची संख्या कमी झालेली दिसते.एआरटी म्हणजेच अँटी रिट्रो व्हायरल ट्रिटमेंट ही रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत करते. अशी केंद्रे सुरुवातीच्या काळात कमी प्रमाणात म्हणजे जिल्ह्यासाठी फक्त एक असायचे. परंतु सध्या पुणे जिल्ह्यात एकूण ५ एआरटी केंदे्र झाल्याने रुग्णांची विभागणी होऊन एआरटी केंद्राचा भार विभागला गेला आहे. रुग्णाला एएफएमसी रुग्णालय, वायसीएम हॉस्पिटल, बारामती एआरटी केंद्र आणि ससून एआरटी रुग्णालय अशी एकूण ५ केंद्रे पुणे जिल्ह्यात झाली आहेत. मंचर उपजिल्हा रुग्णालयात आयसीटीसी केंद्र २००६मध्ये सुरू झाले असले तरी त्या वेळच्या पॉझिटिव्हचा आकडा पाहता २०१७ची आकडेवारी बºयापैकी कमी झालेली आहे. याठिकाणचे समुपदेशक सुहास मानेकर एचआयव्ही जनजागृतीसाठी तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये जातात. पोस्टर्स, प्रवचने, चर्चासत्र या माध्यमातून संवाद साधतात. याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. एड्सबाधित रुग्णांची माहिती गोपनीय ठेवली जाते. २०१७मध्ये एड्स रुग्णांची संख्या कमी झालेली दिसते. अनेक रुग्ण खासगी लॅबमध्ये रक्त तपासणी तसेच उपचार करून घेतात. त्यामुळे एचआयव्ही बाधितांची आकडेवारी समजून येत नाही. मात्र सध्या जी आकडेवारी दिसते ती पाहता रुग्णसंख्या कमी झाली असून, या रोगाबाबत जनजागृती हे त्यांचे मुख्य कारण आहे.१मंचर उपजिल्हा रुग्णालयात सन २००६पासून एचआयव्ही चाचणी केंद्र सुरू झाले. या ठिकाणी मोफत सल्ला व एचआयव्ही चाचणी केली जाते.2खादा रुग्ण एचआयव्ही बाधित आढळला तर त्याचे समुपदेशन करून त्याला जवळच्या वायसीएम हॉस्पिटल या ठिकाणी एआरटी केंद्राला संलग्न केले जाते.3त्या ठिकाणी बाधित व्यक्तीची चाचणी करून तत्काळ उपचार सुरू केले जातात. मंचर उपजिल्हा रुग्णालयात ल्ािंक एआरटी केंद्र सन २००८मध्ये स्थापन झाले आहे.४या ठिकाणी ३०० व्यक्ती औषधोपचार घेत आहेत, हे केंद्र वायसीएम हॉस्पिटलशी संलग्न असल्यामुळे तेथून मंचर हॉस्पिटलला रुग्णांना औषधोपचारासाठी पाठविले जाते.

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्य