शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मतदारयादीत मृत घोषित केल्याने ‘ज्येष्ठ’ मतदानाच्या हक्कापासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 13:55 IST

शासनाने चक्क या ज्येष्ठ नागरिकाला मतदानयादीत मृत घोषित केले आहे.

ठळक मुद्देतहसीलदार, निवडणूक यंत्रणेकडे याबाबत तक्रार

बारामती : शहरात एका ज्येष्ठ नागरिकाला शासकीय यंत्रणेच्या ढिसाळपणाचा अनुभव ऐन मतदानाच्या दिवशी आला. शासनाने चक्क या ज्येष्ठ नागरिकाला मतदानयादीत मृत घोषित केले आहे. त्यामुळे जिवंत असूनदेखील मतदानाच्या अधिकारापासून या नागरिकाला वंचित राहावे लागल्याचा धक्कादायक प्रकार शहरात घडला. दीपक लक्ष्मण भराटे (वय ६०) असे या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. भराटे प्रत्येक वेळी शहरातील राधेश्याम ऐन आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे मतदान करतात. मंगळवारी (दि.२३) देखील ते मतदान ओळखपत्र घेऊन मतदान केंद्रावर पोहचले. मात्र, तेथील अधिकाºयांनी त्यांना रोखले. शासकीय मतदानयादीनुसार तुम्ही मृत आहात. त्यामुळे तुम्हाला मतदान करता येणार नाही, असे मतदान अधिकाºयांनी भराटे यांना सुनावले. त्यामुळे जिवंतपणी ‘मृत’ यादीत नाव गेल्याने भराटे संतप्त झाले. त्यांनी त्यांची सर्व शासकीय कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्यांना सादर केली. मात्र, शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मतदान न करू देण्याची भूमिका कायम ठेवली.शेवटी भराटे यांनी तहसीलदार, निवडणूक यंत्रणेकडे याबाबत तक्रार केली. तरीदेखील उपयोग झाला नाही. त्यांच्या तक्रारीची कोणीही दखल घेतली नाही. तुम्हाला नव्याने नोंदणी करावी लागेल, असे सांगुन त्यांचा मतदानाचा हक्क नाकारण्यात आला.......दीपक भराटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, मतदान यंत्रणेने मला परस्पर मृत घोषित केले. त्यांना पुरावे देऊनदेखील त्यांनी माझी जिवंतपणाची दखल घेतली नाही. वास्तविक मी माझे वडील लक्ष्मण भराटे यांच्या मृत्यूचा दाखला प्रशासनाकडे दिला होता. मात्र, प्रशासनाने वडिलांऐवजी माझ्याच मृत्यूची नोंद केल्याचा धक्कादायक अनुभव आल्याचे सांगितले. 

टॅग्स :BaramatiबारामतीDeathमृत्यूLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदानbaramati-pcबारामती