देहूरोड : मामुर्डी येथे भैरवनाथ यात्रेनिमित आयोजित तमाशात नाचताना झालेल्या धक्काबुक्कीच्या कारणावरुन झालेल्या हाणामारी सुरु होती. ती सोडविण्यास गेलेल्या युवकाच्याच डोक्यात दगड मारून त्याला जखमी करण्यात आले. तसेच त्याच्या चुलत भावांना लाथाबुक्कयांनी मारहाण केली. याप्रकरणी प्रमोद राहूल गायकवाड (वय १८,रा.गायकवाड वस्ती मामुर्डी,पुणे) याने देहूरोड पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या चुलत्याला जातीवाचक शिवीगाळ करून दगडफेक दगडफेक केली. ही घटना सोमवारी रात्री दहाच्या सुमारास मामुर्डी येथे घटना घडली. पोलिसांनी मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता ५ जणांना अटक केली आहे . राजा राऊत,गोटू राऊत, सचिन राऊत,दाद्या ऊर्फ विक्रम राऊत, हेमंत राऊत (सर्व रा. मामुर्डी, पुणे ) यांना अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.
तमाशामध्ये नाचताना झालेल्या वादामुळे दोन गटात हाणामारी, पाच जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 18:25 IST