शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सध्याच्या सोशल मीडियामुळे साहित्याचे लोकशाहीकरण झाले - सुशीलकुमार शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 05:37 IST

सुशीलकुमार शिंदे : साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर

प्रज्ञा केळकर-सिंग 

पुणे : सोशल मीडियामुळे साहित्याचे लोकशाहीकरण झाले आहे. त्यामुळे अभिजन-बहुजन हा भेद काहीसा दूर झाला आहे. सध्या मोठी राजकीय, सामाजिक स्थित्यंतरे होत आहेत. समाजात भयावह घटना घडत आहेत, धार्मिक उन्माद वाढला आहे. कठीण काळातच कवीचे काम आव्हानात्मक असते, अशा शब्दांत कवी सुशीलकुमार शिंदे यांनी कवीचे भावविश्व ‘लोकमत’कडे उलगडले.

साहित्य अकादमीने कवितासंग्रहाची दखल घेतली याचा खूपच आनंद आहे. हा पुरस्कार म्हणजे माझ्यासारख्या काहीतरी लिहू पाहणाऱ्याला मिळालेली कौतुकाची थाप आणि पोचपावतीच आहे. मी ज्या लेखकांचे साहित्य वाचत मोठा झालो, त्यांनाच मी हा पुरस्कार समर्पित करतो, असे शिंदे यांनी सांगितले. ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या कवितासंग्रहाला मुंबईची पार्श्वभूमी आहे. मी मुंबईचे पाहिलेले जग, वेगवेगळे परिघ अशा पद्धतीने कवितासंग्रहामध्ये परिवेश मांडला आहे. ‘कोणत्याही काळी मुके राहण्याचा गुन्हा गंभीरच असतो’, अशा ओळींमधून भावना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नामदेव ढसाळ, अरुण कोल्हटकरांची कविता मला खूप प्रभावी वाटते. लहानपणापासून मी भालचंद्र नेमाडे सरांचे साहित्य वाचतो आहे. माझा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाल्यावर एके दिवशी नेमाडे सरांचे पत्र आले. त्यांनी लिहिले होते की, २०१७ मध्ये सर्वात आवडलेली कविता म्हणजे ‘दहा बाय दहाची खोली’. अशा प्रतिक्रिया एका कवीला खूप समाधान देणाºया, प्रोत्साहन देणाºया असल्याचे त्यांनी सांगितले....तेव्हा कवी व्यथित होतोकवी समाजाचाच एक घटक असतो. दाभोलकरांची हत्या होते, तेव्हा माणूस, कवी म्हणून मी प्रचंड व्यथित होतो आणि त्यातून कविता सुचू लागते. ‘उजेड पेरणाºया मशाली अद्यापही कुणाच्याच गुलाम नाहीत’ अशी एक ओळ कवितेमध्ये आहे. शहरी आणि ग्रामीण, अभिजन आणि बहुजन असा फरक आता राहिलेला नाही, असे मला वाटते. सामाजिक माध्यमांतून साहित्याचे लोकशाहीकरण झाले आहे, असेही शिंदे म्हणाले.

टॅग्स :Puneपुणे