रुळ खचल्याने मुंबई-पुणे मार्गावर वाहतूक विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 13:29 IST2017-07-22T13:29:48+5:302017-07-22T13:29:48+5:30
लोणावळा येथे मंकी हिलजवळ रेल्वे रुळ खचल्यामुळे शनिवारी मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

रुळ खचल्याने मुंबई-पुणे मार्गावर वाहतूक विस्कळीत
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - लोणावळा येथे मंकी हिलजवळ रेल्वे रुळ खचल्यामुळे शनिवारी मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणा-या कोयना एक्सप्रेसच्या चालकाच्या हा प्रकार लक्षात येताच त्याने ट्रेन थांबवली. सकाळी 11.20च्या सुमारास या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. 12.22 च्या सुमारास दुरुस्ती झाल्यानंतर कोयना एक्सप्रेस पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली.
सुदैवाने या वेळी कोणतीही दुर्घटना घडली नाही. मंकी हिल जवळ आठवडयाभरात घडलेली ही दुसरी घटना आहे. दोन ते चार दिवसांपूर्वी ट्रॅकवर मोठे दगड आल्याने हैदराबाद एक्सप्रेस थांबवावी लागली होती.
ब्रिटीश काळात बांधण्यात आलेला हा रेल्वे मार्ग अत्यंत जुना झाला असून, वेळीच प्रशासनाने इथे दुरुस्ती करणे आवश्यक आहे अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते.