शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मुठा कालव्यामुळेच डेंगी व साथीचे आजार; स्वच्छतेची जागरुक नागरिकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 15:30 IST

शहरात तसेच हडपसर परिसरात आलेल्या डेंगी व तत्सम साथीच्या आजारांमागे मुठा कालव्याची अस्वच्छताच कारणीभूत आहे. त्यामुळे कालव्याच्या स्वच्छतेसाठी महापालिकेने नागरिकांच्या साह्याने कालव्याची स्वच्छता त्वरीत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देवानवडी कालव्याच्या कडेने असणाऱ्या सर्व परिसरात दुर्गंधी, डास, चिलटे यांचे साम्राज्यहडपसर कालव्यामध्ये कचरा टाकला जाऊ नये यासाठी नाही कसलीच यंत्रणाच

पुणे : शहरात तसेच हडपसर परिसरात आलेल्या डेंगी व तत्सम साथीच्या आजारांमागे मुठा कालव्याची अस्वच्छताच कारणीभूत आहे. या कालव्याची स्वच्छता त्वरीत केली गेली नाही तर असे आजार आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कालव्याच्या स्वच्छतेसाठी महापालिकेने नागरिकांच्या साह्याने कालव्याची स्वच्छता त्वरीत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.वसंत माने या वानवडी परिसरात राहणाऱ्या जागरूक नागरिकाने परिसरातील रहिवाशांच्या साह्याने याबाबत सविस्तर अभ्यास करून निवेदन तयार केले आहे. त्यांनी सांगितले, की हा कालवा अस्वच्छतेचे आगार झाला आहे. कालव्याला संरक्षक जाळ्या नाहीत, त्यामुळे नागरिक कचरा सरळ कालव्यात टाकतात. त्यातच कपडे, जनावरे, वाहने धुतली जातात. मेलेले उंदीर, घुशी कालव्यात टाकले जातात. त्यामुळे कालव्याच्या कडेने असणाऱ्या सर्व परिसरात दुर्गंधी, डास, चिलटे यांचे साम्राज्य आहे.शेतीसाठी कालव्यातून पाणी सोडले जाते, ते हडपसरच्या पुढे जाते. काही काळाने पाणी सोडणे थांबले की कालव्याचा तळ समपातळीत नसल्यामुळे तेथील अनेक खड्डयांमध्ये पाणी साचते. त्यात डास अळ्या तयार होतात. पुन्हा पाणी सोडले की या अळ्या पुढे प्रवासाला निघतात व पुढचा भागही प्रदुषित करतात. या कालव्याची स्वच्छता कोणी करायची हा प्रश्न आहे. कालव्यामध्ये कचरा टाकला जाऊ नये यासाठी तिथे कसली यंत्रणाच नाही. त्यामुळे अनेक महिने ही स्थिती अशीच आहे असे माने म्हणाले.महापालिकेच्या आरोग्य विभागात त्यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे. कालवा कचरा मुक्त करावा, त्याचा तळ सपाट करावा, काठावरील झाडी नियमीतपणे काढली जावीत, थांबलेल्या पाण्यावर औषध फवारणी करावी असे उपायही माने यांनी सूचवले आहेत. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे त्यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :mula muthaमुळा मुठाpollutionप्रदूषणPuneपुणे