भरधाव बस उलटून मुलाचा मृत्यू, ११ जखमी

By Admin | Updated: January 23, 2016 02:27 IST2016-01-23T02:27:42+5:302016-01-23T02:27:42+5:30

नवी मुंबई येथून कर्नाटकात देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची भरधाव वेगात आलेली खासगी प्रवासी बस मुबई-पुणे द्रुतगती रस्त्यावरील

Due to the bus crash, the child's death, 11 injured | भरधाव बस उलटून मुलाचा मृत्यू, ११ जखमी

भरधाव बस उलटून मुलाचा मृत्यू, ११ जखमी

किवळे : नवी मुंबई येथून कर्नाटकात देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची भरधाव वेगात आलेली खासगी प्रवासी बस मुबई-पुणे द्रुतगती रस्त्यावरील किवळे उड्डाणपुलावर उलटली. त्यामुळे झालेल्या अपघातात एका मुलाचा मृत्यू झाला. ११ जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमारास झाला. अपघातानंतर बसचालक फरार झाला असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यंकटेश हनुमंत साळुंके (वय १६, रा. तुर्भा स्टोअर, नवी मुंबई ) या मुलाचा अपघातात मृत्यू झाला. रामू यल्लाप्पा मंजूळकर (५०), कृष्णा भीमशा मंजूळकर (२६), सुरेखा कृष्णा मंजूळकर (२५), साळूबाई भीमशा मंजूळकर ( ६०), नीलेश रामू मंजूळकर (२०), सतीश रामू इटकर ( २६) , गुंडाप्पा यांकाप्पा साळुंके (६०), नागप्पा गुंडाप्पा साळुंके (५५), अश्विनी रामू इटकर (१५), आकाश रामू इटकर (२२), लक्ष्मी रामू इटकर (४५) अशी तीन कुटुंबातील जखमी झालेल्यांची नावे आहेत. बाबू मंजूळकर ( वय ४६, रा. तुर्भा झोपडपट्टी, नवी मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.(वार्ताहर )

Web Title: Due to the bus crash, the child's death, 11 injured