शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मातृत्वाला फासला काळिमा; मसाल्यामध्ये पाणी सांडल्याच्या कारणावरून चिमुरडीला दिले चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 15:06 IST

मसाल्यामध्ये पाणी सांडल्याच्या कारणावरून पाच वर्षीय चिमुरडीच्या सर्वांगावर जन्मदातीनेच चटके देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देशेजारच्यांनी घरी आलेल्या मुलीच्या अंगावर व्रण पाहिल्यानंतर प्रकार उजेडातमुलीने हा प्रकार सांगितल्यानंतर हडपसर पोलिसांकडून महिलेला अटक

पुणे : मसाल्यामध्ये पाणी सांडल्याच्या कारणावरून पाच वर्षीय चिमुरडीच्या सर्वांगावर जन्मदातीनेच चटके देऊन मातृत्वाला काळिमा फासण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेजारच्यांनी घरी आलेल्या मुलीच्या अंगावर व्रण पाहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. हडपसर पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. सोनी संतोष शेट्टी (रा. गोंधळेनगर) असे तिचे नाव आहे. याप्रकरणी या चिमुरडीच्या शेजारी राहणार्‍या रजनीश तिवारी (वय २८, रा.गोंधळेनगर, हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंधळेनगर परिसरात राहाणारे शेट्टी कुटुंब कामगार आहेत. या परिसरात कुटुंबाने काही खोल्या भाड्याने घेतल्या आहेत. शेजारी राहाणा-यांकडे  चिमुरडी सातत्याने यायची-जायची. नेहमीप्रमाणे शुक्रवारी चिमुरडी आली असता फिर्यादींना तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण दिसले. त्यांनी विश्वासात घेत विचारपूस केली असता केवळ मसाल्यामध्ये पाणी सांडल्याच्या कारणावरून या चिमुरडीला चटके देण्यात आले, शिवाय तोंडावर आणि शरीराच्या इतर भागावर मारहाण केल्याच्या खुणा दिसत होत्या. मुलीने हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी हडपसर पोलीस ठाणे गाठत संबंधित महिलेविरोधात तक्रार दिली. त्यानुसार महिलेला अटक करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांनी दिली. 

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटकPoliceपोलिस