शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पक्षकारांच्या अनुपस्थितीत दस्तऐवज होतात नोटरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 00:25 IST

पिंपरीतील प्रकार : नोटरी वकिलांकडून व्यवसायासाठी अधिकारांचा गैरवापर

पिंपरी : घरासाठीचा भाडेकरार, विविध प्रतिज्ञापत्रे तयार करून घेत त्याचे प्रमाणीकरण करण्याचा अधिकार लेखप्रमाणकास अर्थात ‘नोटरी’स असतो. त्यासाठी संबंधित पक्षकाराकडून अर्थात भाडेकरार किंवा प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या व्यक्तीकडील ओळखपत्र, सबळ दस्तऐवज आणि अन्य पुराव्यांची कायदेशीर पडताळणी करणे आवश्यक आहे. मात्र अशी पडताळणी न करताच नोटरी व्यावसायिकांकडून दस्तऐवजांची ‘नोटरी’ करून देण्यात येत आहे. पिंपरीतील नोटरीवाल्यांकडून व्यवसायासाठी कायदेशीर अधिकारांचा गैरवापर सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. .

केंद्र शासनाच्या विधी आणि न्याय मंत्रालयाकडून वकिलांना निकषानुसार नोटरी व्यवसायासाठी परवाना देण्यात येतो. हा परवाना किती तारखेपर्यंत वैध आहे त्याचा उल्लेख असलेला शिक्का संबंधित व्यावसायिकाकडे असणे बंधनकारक आहे. त्यावर संबंधित नोटरी व्यावसायिकाचे नाव आणि व्यवसायाच्या ठिकाणाचाही उल्लेख असतो. यासह केंद्र शासनाचा गोल शिक्का असतो. असे दोन गोल शिक्के आणि संबंधित व्यावसायिकाच्या सहीमुळे संबंधित दस्तऐवज प्रमाणित केले जाते. विविध कागदपत्रे आणि दस्तऐवजांच्या छायांकित प्रतींची सत्यता पडताळणीसाठीही ‘नोटरी’ वकीलाची सही आणि त्याच्याकडील नोटरीसाठीचे दोन गोल शिक्के वापरून संबंधित झेरॉक्स प्रती सत्य असल्याचे प्रमाणीकरण होते. भाडेकरार आणि विविध प्रतिज्ञापत्र सादर करण्यापूर्वी त्याचेही प्रमाणीकरण अर्थात त्यातील माहिती खरी आहे किंवा काय, याचे प्रमाणीकरण करण्याचा अधिकार नोटरी व्यावसायिकांना आहे.परवानाधारकांच्या अनुपस्थितीत नोटरीपिंपरीतील मोरवाडी येथे न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणात नोटरी व्यावसायिक आहेत. यातील काही व्यावसायिक पडताळणी न करताच दस्तऐवजांचे नोटरी करीत आहेत. काही व्यावसायिक हजर नसतानाही त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे नातेवाईक व अन्य सहकारी दस्तऐवजांचे नोटरी करून देत आहेत. असे करताना संबंधित पक्षकार किंवा दस्तऐवजकर्ता व्यक्तीची ओळख, कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत नाही. घरमालक आणि भाडेकरू यांच्यासाठी भाडेकरार करताना घरमालक उपस्थित नसतानाही भाडेकरार करून देण्यात येत आहे. अशा गैरप्रकारांमुळे कायदेशीर अडचणी निर्माण होत आहेत. या प्रकारांना आळा घालण्यात यावा, अशी मागणी काही नोटरी व्यावसायिकांकडून होत आहे.नोटरी व्यवसायाच्या नावाखाली होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसला पाहिजे. विधी आणि न्याय मंत्रालयाच्या सचिवाकडे पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. त्यांच्याकडून जिल्हा सत्र न्यायालयाकडे पत्रव्यवहार करुन कारवाईबाबत सूचना होऊ शकते.- अ‍ॅड. पी. डी. नांगरे, अध्यक्ष,पिंपरी-चिंचवड नोटरी असोसिएशननोटरी व्यावसायिकांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करीत दस्तऐवज नोटरी केले पाहिजेत. पक्षकाराची ओळख पटवून त्याच्याकडील ओळखपत्र, कागदपत्रांची पडताळणी केली पाहिजे. नोटरी व्यवसायाची प्रतिमा डागाळू नये, यासाठी खबरदारी घ्यावी.- अ‍ॅड. यशवंत खराडे,कार्यकारी अध्यक्ष,महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशन

टॅग्स :Puneपुणे