शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सनदी लेखापालाशिवाय डीएसकेंना घोटाळा अशक्य -सरकारी वकील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 01:59 IST

डीएसकेडीएल २०१४ पासून तोट्यात जाऊ लागली होती. मात्र, कंपनी नफ्यात असल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पुणे - डीएसकेडीएल २०१४ पासून तोट्यात जाऊ लागली होती. मात्र, कंपनी नफ्यात असल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कंपनीचे सनदी लेखापाल सुनील घाटपांडे यांनी योग्य वेळी कंपनी तोट्यात असल्याचे न दाखवल्याने वेगवेगळया बँकांनी डीएसकेडीलला कर्ज मंजूर केले. त्यामुळे सनदी लेखापाल यांच्या मदती शिवाय डीएसकेंना गैरव्यवहार करता येणे शक्य नव्हते, असा युक्तिवाद करत सीए घाटपांडे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात यावा, अशी मागणी सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनी विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांच्या न्यायालयात सोमवारी केली.या प्रकरणातून जामीन मिळावा म्हणून घाटपांडे यांच्यावतीने अ‍ॅड. एस. के. जैन यांनी अर्ज केला आहे. त्यावर युक्तीवाद कराताना अ‍ॅड. चव्हाण म्हणाले, २००७ पासून २०१६ पर्यंत घाटपांडे यांनी डीएसके यांच्या कंपनीतील आर्थिक स्थितीचा अहवाल सादर केलेला नाही.मार्च २०१६-१७ मध्ये कंपनीच्या विरोधात गुंतवणुकदार आक्रमक होऊ लागल्यानंतर तसेच कंपनी विरोधात तक्रारी दाखल होण्यास सुरुवात झाल्यावर त्यांनी सदर वर्षी अहवाल देत, कंपनी आर्थिक डबघाईला लागल्याचे स्पष्ट केले. मे २०१४ पासून डीएसकेडील कंपनीला वेगवेगळी सामुग्री पुरवठा करणा-यांची बीले थकली तर पगार होत नसल्याने कर्मचारी नोकरी सोडू लागले होते.कर विभागाची नोटीस आल्यावर डीएसके यांनी ४७ कोटी रुपये नातेवाईकांमार्फत इतरत्रफिरवले. घाटपांडे यांच्या विरोधात पोलिसांकडे सबळ पुरावे असूनतपास संवेदनशील स्थितीतअसताना त्यांना जामीन देऊ नये, असा युक्तीवाद अ‍ॅड. चव्हाण यांनी केला.मराठेसह चौघांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिकाडीएसके गुंतवणुकदारांनी बँक आॅफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रविंद्र मराठे यांच्यासह चार वरिष्ठ चार अधिका-यांचे जामीना विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सोमवारी विशेष न्यायाधीश साधना जाधव यांचे खंडपीठापुढे गुंतवणुकदारांचे वकील अ‍ॅड. संदीप कर्णिक यांनी बँक अधिकाऱ्यांच्या जामीनास विरोध केला.याप्रकरणी न्यायालयाने सर्व कागदपत्रे पाहून या प्रकरणाचा तपास संवेदनशील स्थितीत असताना पुणे न्यायालयाने बँक अधिका-यांना जामीन देण्यास घाई केल्याचे दिसून आल्याचे मत नोंदवले आहे. तसेच याप्रकरणी न्यायालयाने सविस्तर आदेशपारित करून संबंधितांना नोटीस पाठवली आहे.बचाव पक्षाचे वकील एस. के. जैन यांनी प्रतिवाद करत सरकारी वकीलांचे मुद्दे खोडून काढत घाटपांडे यांना जामीन मिळावा अशी मागणी केली. घाटपांडे यांच्या रिपोर्टनुसार बँकांनी कर्ज दिले नव्हते, असे ते म्हणाले. न्यायालयात याप्रकरणी उर्वरित युक्तिवाद मंगळवारी होणार असून त्यानंतर डीएसके कंपनीचे अभियंता राजेंद्र नेवसेकर यांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद होईल व न्यायालय दोघांचे जामीन अर्जावर निर्णय घेणार आहे.तोट्यातील कंपनी फायद्यात दाखवलीकंपनीत तोट्यात असताना ती फायद्यात असल्याचे दाखवण्यात आले. ज्या प्रकल्पाकरिता बँकाकडून मोठया प्रमाणात पैसे घेण्यात आले, ते त्याकरितान वापरता दुसरीकडे वर्ग करण्यात आले. त्यामुळे कंपनी फायद्यात न येता तिला तोटा होऊन गुंतवणुकदारांकडून स्विकारलेल्या गुंतवणुकदारांना व्याज कंपनी देऊ शकली नाही. सेबीकडून परवानगी घेऊन १११ कोटी रुपये कंपनीने जनतेकडून जमा करत त्याचा दुरुपयोग केला.

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीCourtन्यायालय