शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

डीएसकेंची अटकपूर्व जामीनासाठी धाव; ४ नोव्हेंबरला सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 19:34 IST

डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती यांनी शुक्रवारी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्या अर्जावर शनिवारी (दि. ४) सकाळी अकरा वाजता सुनावणी होणार आहे. 

ठळक मुद्देडीएसके यांच्यावर फसवणूकीबरोबरच महाराष्ट्र ठेवीदार हित संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखलसंस्थेने विश्वासघात केल्याचा, गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचल्याची कलमे देखील लावण्यात आली

पुणे : गुंतवणुकदारांच्या बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) आणि त्यांची पत्नी हेमंती यांनी शुक्रवारी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्या अर्जावर शनिवारी (दि. ४) सकाळी अकरा वाजता सुनावणी होणार आहे. गुंतवणुकदारांना आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांच्या पत्नीवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर फसवणूकीबरोबरच महाराष्ट्र ठेवीदार हित संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या शिवाय संस्थेने विश्वासघात केल्याचा आणि गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचल्याची कलमे देखील लावण्यात आली आहेत. जितेंद्र नारायण मुळेकर यांनी फिर्याद दिली आहे. या शिवाय पाचशेहून अधिक तक्रारदारांनी अर्ज केला आहे.  कुलकर्णी यांनी १९८० ते २०१६ या कालावधीत गुंतवणूकदारांना दहा हजार कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. अनेक गुंतवणुकदारांनी डीएसके देशाबाहेर पलायन करणार अशी अफवा पसरविली आहे. मात्र, त्यांनी त्यांचा पासपोर्ट पोलिसांकडे स्वत:हून जमा केला आहे. तपासात पोलिसांना ते संपूर्ण सहकार्य करीत आहेत. ड्रीम सिटी प्रकल्पातील त्यांचे भागिदार सोडून गेल्याने कंपनी सध्या काहीशी अडचणीत आली आहे. मात्र, त्यांच्या कंपनीकडे पुरेशी मालमत्ता आहे. गुंतवणूकदारांबरोबर देखील त्यांनी अनेक बैठका घेतल्या आहेत. त्यांचा हेतू हा गुंतवणुकदारांचे पैसे बुडविण्याचा नाही. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामिन मिळावा, असे अर्जात म्हटले आहे. डीएसके यांच्यावतीने अ‍ॅड. श्रीकांत शिवदे आणि गिरीष कुलकर्णी यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटकPuneपुणे