शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

डीएसके ड्रीमसिटी म्हाडाला विकसितसाठी देण्याच्या अर्जाला मान्यता नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 11:47 IST

ठेवीदारांचे पैसे परत करण्यास अपयशी ठरल्याने व अनेक मालमत्ता जप्त केल्याने अनेक दिवसांपासून रखडलेला डीएसके ड्रीमसिटी प्रकल्प रखडला आहे.

ठळक मुद्देतडजोड अर्ज  न्यायालयाने फेटाळला : ३४ फौजदारी याचिकांवर ५ ऑगस्टला सुनावणी

पुणे : ठेवीदारांनी केलेल्या मागण्या कायद्यानुसार टिकाव धरणाऱ्या नाहीत. तसेच त्याप्रमाणे शासकीय अधिकाऱ्यांना आदेश करता येणार नाही, असे नमूद करीत प्रकल्प विकसित करण्यासाठी म्हाडाला देण्याचा ठेवीदारांनी केलेला तडजोड अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. भैसारे यांनी नामंजूर केला. ठेवीदारांचे पैसे परत करण्यास अपयशी ठरल्याने व अनेक मालमत्ता जप्त केल्याने अनेक दिवसांपासून रखडलेला डीएसके ड्रीमसिटी प्रकल्प विकसित करण्यासाठी म्हाडाला देण्याचा ठेवीदारांनी केलेला हा तडजोड अर्ज बुधवारी न्यायालयाने फेटाळला. तडजोड मान्य केल्यास डीएसकेंसह इतरांना जामीन देण्यास हरकत नसेल, अशी मागणी अर्जात करण्यात आली होती. त्यामुळे सर्व आरोपींना जामीन मिळण्याची शक्यता होती. दरम्यान डीएसके यांच्याविरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या ३४ फौजदारी याचिकांवर ५ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. ' ड्रीमसिटी' ची ३०० एकर जमीन म्हाडाने ताब्यात घेऊन ती विकसित करावी. म्हाडाने जागा विकसित केली तर २.५ एफएसआय मिळू शकतो. त्यामुळे या मालमत्तेची किंमत ६ हजार कोटी रुपयांपर्यंत पोचते. त्यातून बँक आणि ठेवीदारांचे पैसे देता येऊ शकतात. सरकारला त्यातून ३ हजार कोटी रुपयांचा फायदा होऊ शकतो, असा तडजोड अर्ज २७ ठेविदारांच्यावतीने अ‍ॅड. चंद्रकांत बिडकर यांच्यामार्फत करण्यात आला होता. ठेवीदारांनी केलेल्या अजानुर्सार डीएसके यांच्याकडे किती भागधारकांनी नेमकी किती रक्कम गुंतविली आहे?  याचा कालावधी आणि त्यावरील व्याज तसेच अन्य वित्तीय संस्थांची देय रक्कम किती होते?  याचा तपशील द्यावा. त्यानुसार म्हाडाचे धोरण कळविण्यात येईल, असे म्हाडाकडून ठेवीदारांच्या वकिलांना कळविले होते. तसेच न्यायप्रविष्ट आणि कोणत्याही कारणास्तव बाधित होणाऱ्या जमिनींचे संपादन म्हाडामार्फत करण्यात येत नाही, असे स्पष्ट करीत म्हाडाने याबाबतची वस्तुस्थिती समजून घेण्याची भूमिका घेतली होती. या प्रकरणातील आरोपी दीपक कुलकर्णी (डीएसके), हेमंती कुलकर्णी, शिरीष कुलकर्णी, अनुराधा पुरंदरे, अश्विनी देशपांडे आणि अमित कुलकर्णी यांनी ' ड्रिमसिटी'  विकसित करण्यासाठी म्हाडाला देण्यास व त्यातून आलेले पैसे ठेवीदारांना परत करण्यास मंजुरी द्यावी. तसे झाल्यास गुंतवणूकदार, बॅँका, सर्व कर, डीएसके व इतर सर्वांना पैसे मिळेल, अशी तडजोड करण्याची मागणी अर्जात केल्याची माहिती अ‍ॅड. बिडकर यांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेD.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीCourtन्यायालयmhadaम्हाडाGovernmentसरकार