शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

डी.एस. कुलकर्णींची 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2018 19:46 IST

दोघांनाही विमानाने सायंकाळी पुण्यात आणण्यात आले.

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम उद्योजक डी.एस. कुलकर्णी यांना शनिवारी न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. डी.एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना आज सकाळीच पोलिसांनी दिल्लीतून ताब्यात घेतले होते. त्यानंतर आज संध्याकाळी या दोघांनाही पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने या दोघांनाही 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.उच्च न्यायालयाने शुक्रवारी कुलकर्णी दाम्पत्याचा जामीन काढून घेतला होता. त्यामुळे आपल्याला कोणत्याही क्षणी अटक होईल, याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे डी.एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी पुण्यातून आधीच पसार झाले.  मात्र, या खटल्याचा एकंदरच घटनाक्रम पाहता पोलीस आधीपासूनच सतर्क होते. त्यामुळे पोलिसांनी अगोदरपासूनच मुंबई, दिल्ली आणि पुण्यात चार पथके डी.एस. कुलकर्णी यांच्या मागावर लावली होती. अखेर दिल्लीतील वसंत कुंज परिसरातील डी. एम. सी. क्लबमध्ये ते असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांकडून कुलकर्णी दाम्पत्याला ताब्यात घेण्यात आले. यानंतर दोघांनाही विमानाने सायंकाळी पुण्यात आणण्यात आले. ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जे. ती. उत्पात यांच्यासमोर दोघांनाही हजर करण्यात आले.यावेळी सरकारी वकिलांनी सांगितले की, डी. एस. के. यांनी अत्यंत योजनबद्ध रीतीने लोकांकडून पैसा गोळा केला आणि तो वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत तो पैसा फिरवला. या पैशाची त्यांनी कशाप्रकारे विल्हेवाट लावली, याची चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडी गरजेची असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. न्यायालयाने हा युक्तीवाद ग्राह्य धरत कुलकर्णी दाम्पत्याला 23 फेब्रुवारीपर्यंत पोली कोठडी सुनावली. 

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीPuneपुणे