तहसील कचेरीतून पळविले वाळूट्रक

By Admin | Updated: December 23, 2016 00:04 IST2016-12-23T00:04:04+5:302016-12-23T00:04:04+5:30

तालुक्यात वाळूमाफियांची मुजोरी कायम असून, थेट तहसील कार्यालयाच्या फाटकाचे कुलूप तोडून वाळूचोरट्यांनी तीन ट्रक पळविले

Drying out of Tahsil Kacheri | तहसील कचेरीतून पळविले वाळूट्रक

तहसील कचेरीतून पळविले वाळूट्रक

दौंड : तालुक्यात वाळूमाफियांची मुजोरी कायम असून, थेट तहसील कार्यालयाच्या फाटकाचे कुलूप तोडून वाळूचोरट्यांनी तीन ट्रक पळविले. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. गेल्या सहा महिन्यांतील ही २२वी घटना आहे.
तहसीलदार विवेक साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूमाफियांवर वचक ठेवण्यासाठी गस्तीपथक नेमण्यात आले आहे. त्यानुसार बेकायदेशीर वाळूवाहतूक करणारे तीन ट्रक (एमएच १२-एलटी ७४७१ व एमएच ४२-टी १८९१) पकडून तहसील कचेरीच्या आवारात लावण्यात आले होते.
दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या फाटकाचे कुलूप तोडून तीन्ही ट्रक पळवून नेले असल्याची माहिती ठाणेअंमलदार संजय सुपेकर यांनी दिली. याप्रकरणी महसूल खात्याचे लिपिक ए. डी. ढमे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. महसूल विभागाने कारवाई करून जप्त केलेले ट्रक पळविण्याच्या घटना दौंड तालुक्यात सुरूच आहेत. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवला असून, आरोपींवर अद्याप कारवाई झाली नसल्याचे समजते. (वार्ताहर)

Web Title: Drying out of Tahsil Kacheri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.