दारूच्या नशेत तरुणाने स्वत:लाच पेटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:12 IST2021-05-12T04:12:48+5:302021-05-12T04:12:48+5:30

लोणी काळभोर : भाड्याच्या घटनेत राहणाऱ्या तरुणाने स्वत:ला पेटवले. मात्र, चटके असह्य झाल्याने त्याने घरातील पाण्याच्या बॅरलमध्ये उडी मारली. ...

The drunken youth set himself on fire | दारूच्या नशेत तरुणाने स्वत:लाच पेटवले

दारूच्या नशेत तरुणाने स्वत:लाच पेटवले

लोणी काळभोर : भाड्याच्या घटनेत राहणाऱ्या तरुणाने स्वत:ला पेटवले. मात्र, चटके असह्य झाल्याने त्याने घरातील पाण्याच्या बॅरलमध्ये उडी मारली. मात्र, नशेमध्ये असल्याने त्याचा बॅरलमध्येच मृत्यू झाल्याची घटना लोणी स्टेशन येथे घडली. दोन दिवसांनंतर घरातून दुर्गंधी येऊ लागल्यामुळे या घटनेचा उलगडा झाला.

विवेक पेतराज पंडित (वय ३६, रा. लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे दारूच्या नशेत पेटवून घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. घरात तो एकटाच राहत असल्यामुळे ही घटना कुणालाच कळली नाही. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने खोलीच्या दरवाजाला आतून कडी लावून भरपूर मद्यप्राशन केले होते. नशेत पेटवून घेतल्यावर त्याला आगीचे चटके असह्य झाल्यावर त्याने खोलीतील पाण्याच्या बॅरलमध्ये उडी मारली. बॅरलमधील पाण्यामुळे आग विझली, परंतु दारूच्या नशेत असल्याने त्याला बाहेर यायचे समजले नाही व तो बॅरलमध्येच मरण पावला.

दोन-तीन दिवसांनंतर त्याच्या खोलीतून दुर्गंधीयुक्त वास येऊ लागला. येथील राम शिग्री यांनी ही बाब तत्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या कानावर घातली. पोलिसांनी घटनास्थळी येत दरवाजा तोडत आत प्रवेश केला. विवेक हा भाजलेल्या अवस्थेत बॅरलमध्ये असल्याचे आढळले. मृत शरीर फुगल्याने बॅरल कापून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

Web Title: The drunken youth set himself on fire