दारूच्या नशेत प्रवाशाला गोवा एक्सप्रेसमधून फेकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:13 IST2021-06-16T04:13:39+5:302021-06-16T04:13:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दारूच्या नशेत सोबतच्या प्रवाशांसोबत भांडण करून त्याला धावत्या रेल्वेतून बाहेर फेकण्याची घटना सोमवारी केडगाव ...

दारूच्या नशेत प्रवाशाला गोवा एक्सप्रेसमधून फेकले
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दारूच्या नशेत सोबतच्या प्रवाशांसोबत भांडण करून त्याला धावत्या रेल्वेतून बाहेर फेकण्याची घटना सोमवारी केडगाव स्थानकावर घडली. या प्रकरणी नितीन दीपक जाधव (वय २१, श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर) यास रेल्वे पोलीस दलाने (आरपीएफ) अटक केली.
आरोपी नितीन जाधव व मयत गजानन राठोड (वय ३३, रा. हिंगोली) हे दोघे गोवा एक्सप्रेस (गाडी क्रमांक ०२७८०) च्या जनरल डब्यांतून प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान दोघांची ओळख झाली. काही वेळाने दोघात पिण्याच्या पाण्यावरून वाद झाले. दोघेही दारू प्यायले होते. वाद विकोपाला गेल्यावर आरोपी नितीन जाधवने राठोड यास रेल्वेतून ढकलून दिले. राठोड समोरच्या डाऊन ट्रकवर पडला. राठोड यांचा जागेवर मृत्यू झाला. या वेळी आरोपीने पळ काढण्यासाठी डब्यातील चेन ओढून रेल्वे थांबवली. त्या वेळी ड्युटीवर असलेले आरपीएफ कर्मचारी विठ्ठल भोसले यांनी पळून जाणाऱ्या आरोपीस पाठलाग करून पकडले असता त्याने सर्व हकीकत सांगितली. केडगाव आरपीएफने त्याला ताब्यात घेऊन लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले.