मद्यपी चालकांची उतरणार ‘ङिांग’
By Admin | Updated: August 6, 2014 23:32 IST2014-08-06T23:32:16+5:302014-08-06T23:32:16+5:30
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मिळालेल्या 35 ब्रेथ अल्कोहोल अॅनालायझरच्या साहाय्याने वाहतूक पोलीस गुरुवारपासून ‘ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह’ मोहीम हाती घेणार आहेत.

मद्यपी चालकांची उतरणार ‘ङिांग’
>पुणो : जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मिळालेल्या 35 ब्रेथ अल्कोहोल अॅनालायझरच्या साहाय्याने वाहतूक पोलीस गुरुवारपासून ‘ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह’ मोहीम हाती घेणार आहेत. ब्रेथ अल्कोहोल अॅनालायझरमध्ये जीपीआरएस सिस्टीम आणि जागेवरच फोटो मिळण्याची व्यवस्था असल्याने मद्यपींचे ‘रेकॉर्ड कार्ड’ यानिमित्ताने तयार होईल. रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी या यंत्रचा नक्कीच उपयोग होईल, असे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र जोशी यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून प्रत्येकी 8क् हजार रुपये किमतीचे 38 ब्रेथ अल्कोहोल अॅनालायझर खरेदी केले. या अॅनालायझरमध्ये जीपीआरएस सिस्टीम आहे. ही सिस्टीम मोबाईलला जोडली असून, त्याद्वारे मद्यपी वाहनचालकाचे नाव, गाडीचा क्रमांक, पत्ता अशी सविस्तर माहिती संकलित होईल. वाहनचालकांसमोर पुरावाही ठेवता येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक (प्रशासन) आर. एस. कामिरे यांनी दिली.
पुरावा मिळणार
ब्ल्यू टूथ नावाच्या सिस्टीमने हे ब्रेथ अॅनालायझर, मोबाईल आणि प्रिंटरला जोडले आहे. स्मार्टफोनवरच थेट संबंधित चालकाच्या बोटांचे आणि अंगठय़ाचे ठसे मिळतील. त्याच स्क्रीनवर मद्यपी वाहनचालकाला पकडणा:या कर्मचा:याची स्वाक्षरीही असेल. हे रेकॉर्ड कार्ड न्यायालयात सादर होईल.