शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमविवाहानंतर दारूच्या नशेत पत्नीला मारहाण; पतीला चढवली न्यायालयाची पायरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 15:47 IST

पत्नीला दरमहा सहा हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश

पुणे : ‘ती’ने वयाच्या अठराव्या वर्षी घरच्यांचा विरोध पत्करुन पळून जाऊन त्याच्याशी प्रेमविवाह केला. पतीला तंबाखू व दारुचे व्यसन असल्याने तो दारुच्या नशेत तिला मारायचा.. तब्बल बारा वर्षे तिने तग धरत संसार केला. पण शेवटी असहय झाल्याने अखेर ’ती’ ने कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यांतर्गत फौजदारी अर्ज दाखल करून पोटगीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करीत पत्नीला दरमहा सहा हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. जी. तापडिया यांनी हा आदेश दिला.

माधव आणि सीमा (नाव बदललेली) असे या जोडप्याचे नाव आहे. सीमा यांनी अँड अनघा काळे यांच्यामार्फत याबाबत अर्ज दाखल केला होता. या जोडप्याचा प्रेमविवाह झाला आहे. सीमाचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर घरच्यांचा विरोध पत्करून त्यांनी माधव यांच्याशी पळून जाऊन लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. संसार थाटल्यानंतर पतीला तंबाखू आणि दारुचे व्यसन असल्याचे सीमा यांना समजले. पतीकडून दारूच्या नशेत मारहाण होणे आणि शिवीगाळ हे सीमा यांना नित्याचेच झाले होते. आज ना उद्या पतीच्या स्वभावात बदल होईल या आशेवर पत्नीने १२ वर्षे तग धरला. मात्र पतीने ना मुलांची जबाबदारी घेतली ना पत्नीची. दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा, औषधपाण्याचा सर्वच खर्च सीमा यांना करावा लागत असे. त्यासाठी त्यांनी येथील काही सामाजिक संस्थांची देखील मदत घेतली आहे.पतीच्या वागण्यात सुधार होत नसल्याने अखेर सीमा यांनी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यांतर्गत फौजदारी अर्ज दाखल करून पोटगीची मागणी केली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत न्यायालयाने पत्नीला दरमहा सहा हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश पतीला दिला.

टॅग्स :Puneपुणेhusband and wifeपती- जोडीदारCourtन्यायालयSocialसामाजिक