शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या नशेत चालकाने गाडी थेट बस स्टॉपमध्ये चढवली; सुदैवाने अनर्थ टळला

By किरण शिंदे | Updated: June 2, 2025 12:20 IST

सुदैवाने रात्रीचा वेळ असल्यामुळे बस थांब्यावर कोणी प्रवासी नव्हते

किरण शिंदे

Pune Crime: शहरातील वाहतूक शिस्तीला धक्का देणारी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना नुकतीच समोर आली आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील पंचमी चौकाजवळील भापकर पेट्रोल पंपाजवळ ३० मे रोजी रात्री ११ वाजता दारूच्या नशेत असलेल्या चालकाने गाडी थेट बस स्टॉपमध्ये घातली.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश गोरख जेवे असे या गाडी चालवणाऱ्या इसमाचे नाव असून, तो MH12 KT 4764 या क्रमांकाची चारचाकी चालवत होता. नशेत असलेला जेवे याचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने बस स्टॉपमध्ये गाडी घातली. सुदैवाने रात्रीचा वेळ असल्यामुळे बस थांब्यावर कोणी प्रवासी नव्हते, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, नागरिकांमध्ये या बाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. माहिती मिळाल्यानंतर पार्वती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात 'ड्रिंक अँड ड्राइव्ह' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासोबतच, संबंधित गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली असून, वाहन चालकाचा परवाना रद्द करण्यासाठी अहवाल प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारी