माळेगावात दारुविक्रेत्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:11 IST2021-05-07T04:11:45+5:302021-05-07T04:11:45+5:30

बारामती : माळेगाव बु. (ता. बारामती) येथील एका घराच्या आडोशाला अवैधरीत्या सुरू असणाऱ्या दारुअड्डयावर पोलिसांनी ...

On a drug dealer in Malegaon | माळेगावात दारुविक्रेत्यावर

माळेगावात दारुविक्रेत्यावर

बारामती : माळेगाव बु. (ता. बारामती) येथील एका घराच्या आडोशाला अवैधरीत्या सुरू असणाऱ्या दारुअड्डयावर पोलिसांनी छापा टाकला आहे. यावेळी केलेल्या कारवाईत तीन हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. याबाबत पोलीस कर्मचारी निखिल बाळासाहेब जाधव यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राहुल दिलीप गोंडे याच्या विरोधात मुंबई दारुबंदी अधिनियमासह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथीचे रोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस कर्मचारी निखिल बाळासाहेब जाधव यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मंगळवारी (दि. ४) रात्री ८ वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विधाते, हवालदार गायकवाड, दराडे, चितारे यांनी ही कारवाई केली. पोलिसांची चाहूल लागताच गोंडे हा पळून जावू लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला पकडले.

Web Title: On a drug dealer in Malegaon