आंध्रप्रदेशातील तरुणाचा तोरणा किल्ल्यावरील तळ्यात बुडून  मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 19:32 IST2017-08-25T19:31:20+5:302017-08-25T19:32:00+5:30

वेल्हे तालुक्यातील तोरणा किल्ल्यावरील टाके तळ्यातील खोल पाण्यात बुडून युवकाचा मत्यू झाल्याची दुर्घटना शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता घडली.

The drowning youth of Andhra Pradesh drowned in the tank on the fort | आंध्रप्रदेशातील तरुणाचा तोरणा किल्ल्यावरील तळ्यात बुडून  मृत्यू

आंध्रप्रदेशातील तरुणाचा तोरणा किल्ल्यावरील तळ्यात बुडून  मृत्यू

वेल्हे, दि. 25 -  वेल्हे तालुक्यातील तोरणा किल्ल्यावरील टाके तळ्यातील खोल पाण्यात बुडून युवकाचा मत्यू झाल्याची दुर्घटना शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता घडली. यशवंत गोल्लापुडी (वय २२) असे या युवकाचे नाव आहे. सदर मयत युवक आंध्रप्रदेश राज्यातील असून पुणे येथे अर्थशास्त्र  विषयाच्या पदवीचे शिक्षण घेत आहे.

घटना घडल्याचे वृत्त कळताच वेल्ह्यातील मावळा जवान संघटनेची रेस्क्यू टीम आणि पोलीस पथक किल्ल्यावर किल्ल्यावर रवाना झाले. वेल्हे पोलीस ठाण्याचे पो. नी. विकास बडवे यांच्या नेतृत्वाखाली मावळा रेस्क्यू फोर्सच्या युवकांनी यशवंत गोडापुल्ली याचा मृतदेह तळ्यातून बाहेर काढला. 
अतिपावसामुळे मृतदेह झोळीत घालून तोरणा किल्ल्यावरुन वेल्ह्यात आणण्यात येत आहे.                        

Web Title: The drowning youth of Andhra Pradesh drowned in the tank on the fort