शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

वाहनचालकांची बसली पाचावर धारण!!! उलट्या बाजूने आलेल्या पीएमपीने रस्ता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 14:02 IST

वर्दळीच्या स्वामी विवेकानंद रस्त्यावर भल्या सकाळी पीएमपी बस रस्त्याच्या उलट्या बाजूने घुसल्यामुळे समोरुन येणार्‍या वाहनचालकांची पाचावर धारण बसली.

ठळक मुद्देबस बंद करुन रस्त्यामध्ये तशीच बेवारस सोडून चालक आणि वाहक दोघेही गायबपीएमपी प्रशासनाचा बेजाबदारपणा यानिमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर

पुणे : वर्दळीच्या स्वामी विवेकानंद रस्त्यावर भल्या सकाळी पीएमपी बस रस्त्याच्या उलट्या बाजूने घुसल्यामुळे समोरुन येणार्‍या वाहनचालकांची पाचावर धारण बसली. चालता चालता अचानक बस बंद करुन रस्त्यामध्ये तशीच बेवारस सोडून चालक आणि वाहक दोघेही गायब झाल्यामुळे या रस्त्यावर वाहतूककोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी वारंवार पीएमपी प्रशासनाला कळवूनही दुपारी दीड वाजेपर्यंत ही बस हलविण्यात आलेली नव्हती. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपीची एमएच १४, सीडब्ल्यू १७८२ ही बस स्वामी विवेकानंद रस्त्यावरुन स्वारगेटकडून बिबवेवाडीच्या दिशेने येत होती. बिबवेवाडीकडून स्वारगेटच्या दिशेला जाणार्‍या मार्गिकेमध्ये घुसली. त्यामुळे समोरुन येत असलेल्या वाहनचालकांना अचानक समोरुन आलेल्या बसमुळे धडकी भरली. विरुद्ध दिशेने बस आल्यामुळे वाहनचालकही गडबडून गेले होते. काही जणांनी घाबरुन आपापली वाहने बाजुला घेतली. दरम्यान, ही बस बंद करुन रस्त्यावर आहे तशा अवस्थेत ही बस ठेवून चालक आणि वाहक निघून गेले.पोलिसांच्या माहितीनुसार, ही बस ठेकेदाराकडील आहे. वाहतूककोंडी झाल्याचे समजताच सकाळी सकाळी वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक भगवान सावंत आणि हवालदार खराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करीत असतानाच वारंवार पीएमपीच्या अधिका-यांना आणि नियंत्रण कक्षाला फोन बस हलविण्यासंदर्भात विनंती केली. मात्र, पीएमपीकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांचे स्वीय सहायक हांडे यांनाही संपर्क साधून याबाबत माहिती देण्यात आली. मात्र, अधिकार्‍यांची बैठक सुरु असल्याचे कारण देत वेळ मारुन नेण्यात आली. हा प्रकार दुपारी दीड वाजेपर्यंत सुरु होता. पीएमपी प्रशासनाचा बेजाबदारपणा यानिमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. बस विरुद्ध बाजुने का नेण्यात आली आणि रस्त्याच्या मधोमध का उभी करण्यात आली याबाबत कोणीही समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाही.

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीस