ड्रायव्हरलेस कार लवकरच रस्त्यावर
By Admin | Updated: January 23, 2017 03:05 IST2017-01-23T03:05:04+5:302017-01-23T03:05:04+5:30
तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. सेन्सर, रडार, जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्णत: चालविरहित व स्वयंचलित मोटारगाड्या

ड्रायव्हरलेस कार लवकरच रस्त्यावर
पुणे : ‘तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. सेन्सर, रडार, जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्णत: चालविरहित व स्वयंचलित मोटारगाड्या रस्त्यावर येऊ लागल्या आहेत. येत्या ३०-४० वर्षांत मोठ्या प्रमाणात चालकविरहित गाड्या रस्त्यावर आल्या, तर अपघात होण्याचे प्रमाण कित्येकपटीने कमी होईल व अनेकांचे जीव वाचतील आणि रस्ते वाहतुकीत मोठी क्रांती घडेल, असे मत आॅस्ट्रेलिया येथील मेलबर्नच्या ट्रॉबे विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि संचालक डॉ. अनिरुद्ध देसाई यांनी व्यक्त केले.
मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने ‘चालकविरहित मोटारगाडी’ या विषयावर टिळक स्मारक मंदिराच्या बेसमेंट हॉलमध्ये आयोजित व्याख्यानात डॉ. देसाई बोलत होते. याप्रसंगी परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. यशवंत घारपुरे, विनय र. र. आदी उपस्थित होते.
डॉ. देसाई म्हणाले, ‘‘भारतातील वाहतूककोंडीला कंटाळलेले ७० ते ८० नागरिक चालकविरहित गाड्यांचे स्वागत करायला उत्सुक आहेत. प्रायोगिक तत्त्वावर आॅस्ट्रेलियामध्ये त्यांची निर्मिती केली जात आहे. रोडमॅपिंग, जीपीएस, इंटरनेटचे जाळे आदी गोष्टींवर सखोल अभ्यास व त्याची उभारणी होणे गरजेचे आहे.’’
विनय र. र. यांनी सूत्रसंचालन केले. संजय मालती कमलाकर यांनी संयोजन केले.