शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

विकतच्या फास्टॅग कडे वाहनचालकांची पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 13:22 IST

इलेक्ट्रॉनिक टोलवसुली करण्यासाठी वाहनांना 'फास्टॅग ' लावणे आवश्यक

ठळक मुद्देकेंद्र सरकारने २ नोव्हेंबर २०१८ पासून सर्व परिवहन वाहनांना फास्टॅग केला बंधनकारकरपत्रकामध्ये स्पष्टता नसल्याचा दावा; ठिकठिकाणी केले उपलब्ध अपेक्षित प्रतिसाद मिळेना टॅगमध्ये किमान १५० रुपये प्रत्येक वेळी शिल्लक असणे आवश्यक

पुणे : इलेक्ट्रॉनिक टोलवसुली करण्यासाठी वाहनांना 'फास्टॅग ' लावणे आवश्यक आहे. केंद्र शासनाने या फास्टॅगसाठी २०० ते ५०० रुपयांपर्यंतचे डिपॉझिट ठेवले होते, तर खासगी एजन्सीकडून ५०० ते ९०० रुपये आकारून वाहतूकदारांची लूट होत होती. त्यामुळे फास्टॅग लावण्याकडे वाहनचालकांनी पाठ फिरविल्याने अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे केंद्र शासनाने फास्टॅग फुकटात उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. आता तरी फास्टॅग वाहनचालकांकडून फास्टॅग घेतला जाईल, अशी अपेक्षा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.केंद्र सरकारने २ नोव्हेंबर २०१८ पासून सर्व परिवहन वाहनांना फास्टॅग बंधनकारक केला आहे. याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर दरपत्रकामध्ये स्पष्टता नसल्याचा दावा वाहतूकदारांनी केला. त्यामुळे टॅग घेण्याबाबत अनेक वाहतूकदारांमध्ये संभ्रम होता. परिणामी, टॅगची अपेक्षित विक्री होत नव्हती. हे टॅग सर्व टोलनाके, नोंदणीकृत बँका, प्रादेशिक परिवहन कार्यालये, मार्गावरील फूड प्लाझा आदी ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले होते. पण २०० ते ५०० रुपये डिपॉझिट असल्याने तसेच खासगी एजन्सीकडून वाढीव शुल्क घेतले जात असल्याने अनेकांनी त्याकडे पाठ फिरविली. आता १ डिसेंबरपासून सर्व वाहनांसाठी हा टॅग बंधनकारक केला आहे. हा टॅग नसल्यास दुप्पट टोल घेतला जाणार असल्याचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच हा टॅग मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणाही त्यांनी केली.ह्यएनएचएआयह्णच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारपासूनच फास्टॅग मोफत उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली आहे. आता सर्व टोलनाके, बँकांमध्ये हे टॅग उपलब्ध असतील. मात्र, टॅग घेताना किंवा नंतर रिचार्जची रक्कम भरावी लागेल. अन्यथा त्याचा काहीच उपयोग नाही. तसेच टॅगमध्ये किमान १५० रुपये प्रत्येक वेळी शिल्लक असणे आवश्यक आहे. १ डिसेंबरपासून टोलनाक्यांवर सर्व लेन फास्टॅगसाठी करण्यात येतील. फास्टॅग नसलेल्या वाहनांसाठी एखादी स्वतंत्र लेन ठेवली जाऊ शकते. याआधी दररोज २० ते २५ टॅग जात होते. हे प्रमाण अपेक्षेपेक्षा खूप कमी होते, असेही अधिकाºयांनी सांगितले. ......फास्टॅग विक्रीत मोठा भ्रष्टाचार सुरू होता. देशातील अनेक टोलनाक्यावर टॅगद्वारे टोलवसुलीची यंत्रणा नाही किंवा काही ठिकाणी नादुरुस्त असते. अशा वेळा वाहनमालकांना आर्थिक फटका बसतो. टॅग असून एकाच रस्त्यावर दोनदा टोल घेतला जात असल्याचे प्रकार घडत आहेत. या प्रणालीमध्ये कोणतीही स्पष्टता नाही. ........---------------------------प्रणालीमध्ये कोणतीही स्पष्टता नाहीप्रत्येक आरटीओबाहेर त्याची विक्री करून चालकांची लूट केली जात आहे. त्यामुळे फास्टॅग १ डिसेंबरपासून बंधनकारक करण्यास विरोध असल्याचे महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले. टॅग मोफत दिला तरी पुढील आठ दिवसांत सर्वांना टॅग बसविणे शक्य नाही, त्यामुळे मुदतवाढ देऊन सर्व यंत्रणा व्यवस्थितपणे कार्यरत कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली......टोलनाक्यांवर शुल्क भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामध्ये वेळ व इंधनही खूप वाया जाते. याची बचत करण्यासाठी सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. रेडिओ फ्रिक्वेन्सी टॅगसारखा हा फास्टॅग काम करतो. वाहनाच्या पुढील बाजूच्या काचेवर एका बाजूला टॅग लावला जातो......हा टॅग प्रवासावेळी रिचार्ज करणे आवश्यक आहे. वाहन टोलनाक्यावर आल्यानंतर तिथे थांबण्याची गरज पडणार नाही. कॅमेºयाद्वारे हा फास्टॅग स्कॅन होऊन त्यातील टोलचे पैसे कापले जातील. त्यामुळे वेळ आणि इंधनाचीही बचत होईल. ..

टॅग्स :PuneपुणेtollplazaटोलनाकाCentral Governmentकेंद्र सरकारfour wheelerफोर व्हीलरhighwayमहामार्ग