पालिकेच्या वाहनाने युवकाला चिरडले
By Admin | Updated: January 28, 2017 01:51 IST2017-01-28T01:51:54+5:302017-01-28T01:51:54+5:30
कर्वेनगरमधील गोसावीवस्ती भागात शुक्रवारी (दि. २७) दुपारी तीनच्या सुमारास पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या टँकरने

पालिकेच्या वाहनाने युवकाला चिरडले
कर्वेनगर : कर्वेनगरमधील गोसावीवस्ती भागात शुक्रवारी (दि. २७) दुपारी तीनच्या सुमारास पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या टँकरने दुचाकीला जोरदार दिलेल्या धडकेत दुचाकीचालक शंतनू पुजारी (वय १९, रा. शिवतीर्थनगर, कोथरूड) या तरुणाचा मागच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला. त्याचा सहकारी शिरीष चिंचणे (वय १९) किरकोळ जखमी झाला.
पालिकेच्या उद्यान विभागाचा टँकर (एमएच १२ एचडी ३४२८) राहुलनगर, कोथरूडवरून बिंदू माधव ठाकरे रुग्णालयाच्या दिशेने जात असताना, वळणावर समोरून आलेल्या दुचाकी (एमएच १२ एनएन ८४९६)ला टँकरची धडक बसली. या वेळी शंतनू टँकरच्या मागील चाकाखाली फेकला जाऊन, त्याचा जागीच मृत्यू झाला. शिरीष जखमी झाला. (वार्ताहर)