शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

पेट्रोलशिवाय चालवा गाडी; पुण्यात आरटीओचा वाहन महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 15:20 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे विभाग व ई व्हेईकल असोसिएशन आॅफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ई वाहन महोत्सव आणि ई वाहनांचे प्रदर्शन व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देप्रदूषण टाळण्याचा हेतूने या वाहनांचा वापर करणे फार महत्त्वाचे आहे. विजेवर चालणार्‍या या वाहनांना पेट्रोलची गरज लागत नाही. या सर्व वाहनांचे मटेरियल हे मेड इन इंडिया आहे.

पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे विभाग व ई व्हेईकल असोसिएशन आॅफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ई वाहन महोत्सव आणि ई वाहनांचे प्रदर्शन व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन रविवारी सकाळी १०.३० वाजता रश्मी उर्ध्वरेशे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे आदी उपस्थित होते. प्रदर्शनात विजेवर चालणार्‍या बस, ई-रिक्षा, सायकल, बाईक, तसेच मालवाहतूक टेम्पो, सोलर पॅनेल, टेम्पो अशा विजेवर चालणार्‍या वाहनांचा समावेश होता.

विजेवर चालणार्‍या या वाहनांना पेट्रोलची गरज लागत नाही. प्रदूषण टाळण्याचा हेतूने या वाहनांचा वापर करणे फार महत्त्वाचे आहे. ई शालेय बस या वाहनामध्ये २५ लोक बसू शकतात, एवढ्या आसनव्यवस्थेची सोय करण्यात आली आहे. एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर ही बस १२० किलोमीटरचा प्रवास करू शकते. यासाठी वापरलेले मटेरियल हे मेड इन इंडिया असून कॅमेरा आणि जी. पी. एस. सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे. या सिस्टीममुळे पालकांना आपला मुलगा बसमध्ये सुरक्षित आहे की नाही ते कळणार आहे. शिवाय बस चालवणे अत्यंत सोपे आहे. 

ई सायकल आणि बाईक या वाहनांमध्ये सायकलला एक इलेक्ट्रॉनिक किट दिले जाते. या किटमध्ये बॅटरी, चार्जर, स्पीड मीटर या गोष्टी आहेत. हे कीट आपण कुठल्याही सायकलला सहज बसवून घेऊ शकतो. पूर्णपणे चार्ज केल्यावर ३० किलोमीटरचा प्रवास करू शकते आणि चार्जिंग संपल्यावर साधारण सायकलसारखी चालवता येते. तर बाईकमध्ये पूर्णपणे चार्ज केल्यावर ७० ते ८० किलोमीटरचा प्रवास करता येतो. ई टेम्पो आणि ई पॅसेंजर या दोन्ही वाहनांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. ई टेम्पो हे मालवाहतूक वाहन आहे. ई टेम्पो एका वेळेस ६०० किलो वजन वाहू शकते. पूर्णपणे चार्ज केल्यावर ८० किलोमीटरचा प्रवास पार करते. ई पॅसेंजर या वाहनाची एका वेळेस ५ व्यक्ती घेऊन जाण्याची क्षमता आहे. इतर सर्व सुविधा ई टेम्पोप्रमाणे आहेत. ई रिक्षा ही एकदा पूर्णपणे चार्ज केल्यावर ११० किलोमीटरचा प्रवास करते. 

सोलर पॅनेल हे वाहन इतर वाहनांपेक्षा थोडे वेगळे आहे. त्यामध्ये एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर ती १६० किलोमीटरचा प्रवास करते पण ७० ते ८० किलोमीटरच्या प्रवासानंतर ती सौर ऊर्जेची मदत घेते आणि अधिक काळ वाहन चालण्यास मदत होते. या प्रदर्शनात ए. एंटरप्राइजेस, ओंकार ग्रुप, ई आॅटो बस, प्राणिक  मार्केटिंग, सोलर आॅटो, टेरा मोटर्स, ओरेवा बाईक, कायनेटिक ग्रीन कंपन्यांचा सहभाग आहे. या सर्व वाहनांचे मटेरियल हे मेड इन इंडिया आहे.

टॅग्स :Puneपुणे