जबाबदारीने वाहने चालवावीत
By Admin | Updated: January 26, 2017 00:20 IST2017-01-26T00:20:58+5:302017-01-26T00:20:58+5:30
स्वत:चा आणि जवळच्या व्यक्तीचा जीव अत्यंत मोलाचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वाहने चालवावीत असे मत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी मांडले.

जबाबदारीने वाहने चालवावीत
रावेत : स्वत:चा आणि जवळच्या व्यक्तीचा जीव अत्यंत मोलाचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वाहने चालवावीत असे मत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी मांडले. रस्ता सुरक्षा अभियान २०१७ अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड आणि प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकुर्डी यांच्या विद्यमाने आयोजित समारोप समारंभात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, ‘‘ड्रायव्हिंग हे आपले पॅशन आहे. परंतु वाहन चालविताना मी वाहतुकीच्या नियमांचे पालन करते. आपल्या जवळच्या व्यक्तीचे अपघाताने अकस्मात जाण्याचा अनुभव घेतलेला आहे. अशी वेळ आपल्यावर येऊ नये.’’
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड आणि प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान २०१७ या कार्यक्रमाच्या समारोप समारंभी बाबासाहेब आजरी प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे विभाग, अजित शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, विनोद चव्हाण सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार मोहनराव देशमुख, मोटार वाहन निरीक्षक चंद्रकांत माने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे
उपस्थित होते. प्रास्ताविक करताना सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून
दिली. तसेच या रस्ता सुरक्षा अभियानामागे असणारी भूमिका सांगून या अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी आणि अपघाताचे प्रमाण कमी व्हावे या एकाच उद्देशाने हे कार्यक्रम घेतले जात असल्याचे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले. (वार्ताहर)