महाराष्ट्रचा विकास आराखडा लोकांर्पयत पोहोचवा : पुरंदरे
By Admin | Updated: September 29, 2014 23:54 IST2014-09-29T23:54:55+5:302014-09-29T23:54:55+5:30
मनसेने बनविलेला महाराष्ट्राचा विकास आराखडा जास्तीत जास्त लोकांर्पयत पोहोचवा.

महाराष्ट्रचा विकास आराखडा लोकांर्पयत पोहोचवा : पुरंदरे
>पुणो : मनसेने बनविलेला महाराष्ट्राचा विकास आराखडा जास्तीत जास्त लोकांर्पयत पोहोचवा. तसेच जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधण्याचे मार्गदर्शन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मनसेचे पर्वती मतदार संघातील उमेदवार जयराज लांडगे यांना केले. आपल्या प्रचाराची सुरुवात जयराज लांडगे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आशीर्वाद घेऊन केली.
राजकारण फक्त निवडणुकीपुरतं मर्यादित नाही. राजकारणाला विचार असणं, त्या विचाराला मूल्यांचा आधार असणं, हेतू असणं आवश्यक आहे. राजकारणाला काही श्रद्धा, काही आग्रह असणं आवश्यक आहे. तो विचार सर्वानी मिळून ठरवावा, कुठे जायचं ते निश्चित करावं, आपली दिशा पक्की असावी आणि आपण सर्वानी मिळून एका मोठय़ा मराठी समाजाचं आणि संपन्न महाराष्ट्राचं स्वप्न पाहावं म्हणून महाराष्ट्राचा विकास आराखडा मनसेने तयार केल्याचे जयराज लांडगे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना सांगितले.
समाजातील शेतकरी, महिला, पोलीस व तरुणांसाठी असलेली मनसेची भूमिका तसेच मनसेच्या महाराष्ट्राच्या विकास आराखडय़ात समाविष्ट असलेल्या शेतक:यांची संपूर्ण कजर्माफी, चांगली वाहतूक सुविधा, ट्रॅफिक व्यवस्थापन, पाण्याचे नियोजन, प्रशासन या महत्त्वपूर्ण विषयांची माहिती दिली. प्रचारफेरीत जिल्हा संघटक रणजित शिरोळे, नगरसेवक राहुल तुपेरे, नगरसेवक प्रिया गदादे, मनसेचे विभागध्यक्ष संदीप शिंदे, महिला आघाडी उपाध्यक्ष कल्पना जाधव, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आशिष साबळे, सचिन लांडगे सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)