फराटे पाटील यांच्या मदतीने मिळाली ‘दृष्टी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:13 IST2021-07-14T04:13:49+5:302021-07-14T04:13:49+5:30
याबाबत सविस्तर असे की, मांडवगण फराटा येथील ग्रामपंचायतमध्ये मंदाबाई कुंभार या सफाई कामगार म्हणून काम करतात. गेल्या काही दिवसांपासून ...

फराटे पाटील यांच्या मदतीने मिळाली ‘दृष्टी’
याबाबत सविस्तर असे की, मांडवगण फराटा येथील ग्रामपंचायतमध्ये मंदाबाई कुंभार या सफाई कामगार म्हणून काम करतात.
गेल्या काही दिवसांपासून त्यांना काचबिंदू आणि अतिपक्व मोतीबिंदूमुळे डाव्या डोळ्याची १०० टक्के नजर गेली होती.
परंतु तरीही त्या नियमित काम करत होत्या. दोन दिवसांपूर्वी त्यांना अचानक दिसणे बंद झाले. मात्र उपचारांइतके पैसे नसल्याने त्या घरी बसून होत्या. ही बाब राजीव पाटील फराटे यांना समजली.
त्या वेळी त्यांनी त्यांना शिरूर येथील व्हिजन आय केअर सेंटर येथे स्वत:च्या वाहनातून नेऊन उपचारासाठी दाखल केले.
रुग्णालयाचे संचालक डॉ. स्वप्नील भालेकर यांना सर्व वस्तुस्थिती सांगितल्यानंतर डॉ. भालेकर यांनी देखील क्षणाचाही विलंब न लावता त्वरित उपचार करून महिलेस नवी दृष्टी मिळवून दिली. डॉ.स्वप्नील यांनी ती कठीण शस्त्रक्रिया करून इम्पोर्टेड कृत्रिम लेन्स बसविले व त्यांना पुन्हा नवी दृष्टी दिली.