शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची तडकाफडकी बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 00:15 IST

ससूनमधील कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू रोखण्यात अपयश येत असल्याने ही बदली करण्यात आल्याची चर्चा..

पुणे : बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची राज्य शासनाने गुरुवारी तडकाफडकी बदली केली आहे. रुग्णालयामध्ये मागील १५ दिवसात ३८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाले आहेत. हे मृत्यू रोखण्यात अपयश येत असल्याने ही बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, उप अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ससूनच्या नवीन इमारतीला कोविड रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला. या इमारतीत रुग्णांवर उपचारही सुरू झाले आहेत. त्यापूर्वी जुन्या इमारतीतील २७ व २८ क्रमांकाच्या वॉर्ड मध्ये दि. ३१ मार्च पासून बाधित रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर दोन दिवसापासूनच बाधित रुग्णांच्या मृत्यू चे प्रमाण वेगाने वाढत गेले. दररोज किमान एक तरी मृत्यू होत आहे. त्यामुळे १६ दिवसातच हा आकडा ३८ वर पोहचला. देशातील कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यू दरात पुणे आघाडीवर आहे. हेच कारण चंदनवाले यांना भोवल्याची चर्चा आहे. त्यांच्या विषयी काही राजकीय नेत्यांनी शासनाकडे तक्रारी ही केल्या होत्या. त्यांच्या निष्काळजीपणा मुळेच मृत्यू वाढल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच शासनाने मृत्यूचा अभ्यास करण्यासाठी टास्क फोर्स ही स्थापन केले आहे. या पार्श्वभूमीवर चंदनवाले यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. सध्या त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सह संचालक पदाची अतिरिक्त जबाबदारी होती. आता या पदाची पूर्णवेळ जबाबदारी देण्यात आली आहे. तर ससून चा पदभार उप अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. डॉ. यांनी यापूवीर्ही ही जबाबदारी सांभाळली आहे.---------शासन आदेशाचे पालन केले जाईल. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सह संचालक पदावर बदली झाली आहे. शुक्रवारी डॉ. तांबे यांच्याकडे पदभार सोपविला जाईल.डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून रुग्णालय-----

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मी अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्याविषयी तक्रार केली होती. त्यांनी खातरजमा आणि चौकशी करून योग्य निर्णय घेतल्याबद्दल आभार व्यक्त करतो. ससूनमध्ये कोरोनाच्यादृष्टीने अत्यंत असंवेदनशील कारभार त्यांनी केला. ससूनकडे सीएसआर फँडातील २२ कोटी रुपये पडून आहेत. ते कोरोनासाठी का वापरले गेले नाहीत? चंदनवाले यांच्या गैरकाराभराचे पुरावे कागदपत्रे व व्हिडिओसह कोरोनाचे संकट टळल्यावर सादर करणार आहे. 

- अरविंद शिंदे, महापालिका गटनेते, काँग्रेस

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर