महिलांचे कर्तृत्व वादातीत डॉ. सदानंद मोरे : कनि महिला मंचतर्फे गुरू गौरव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:09 IST2021-07-26T04:09:54+5:302021-07-26T04:09:54+5:30

गुरुपौर्णिमेनिमित्त कनि महिला मंच आयोजित कार्यक्रमात माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते डॉ, मोरे यांना गुरु गौरव पुरस्कार देऊन ...

Dr. without question of women's performance. Sadanand More: Guru Gaurav Award by Kani Mahila Manch | महिलांचे कर्तृत्व वादातीत डॉ. सदानंद मोरे : कनि महिला मंचतर्फे गुरू गौरव पुरस्कार

महिलांचे कर्तृत्व वादातीत डॉ. सदानंद मोरे : कनि महिला मंचतर्फे गुरू गौरव पुरस्कार

गुरुपौर्णिमेनिमित्त कनि महिला मंच आयोजित कार्यक्रमात माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते डॉ, मोरे यांना गुरु गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पत्रकार भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, अभिनेत्री अक्षया देवधर, प्रशांत अनासपुरे, बाळासाहेब दाभेकर, कनि महिला मंचच्या संस्थापक कल्याणी कदम, सहसंस्थापक निलिमा अलुलकर, व्यवस्थापक योगेश ठीक उपस्थित होते. वारक-यांच्या वेशातील महिला दिंडीने उपस्थितांचे स्वागत केले. कनि महिला मंचच्या ‘आरंभ’ या विशेषांकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

उल्हास पवार म्हणाले, ‘अमेरिका, चीन, रशिया या देशांनी आधुनिकतेच्या कितीही बढाया मारल्या तरी जगाच्या पाठीवर भारतीय संस्कृती हीच सर्वात श्रेष्ठ आहे. संत साहित्य असो की राजकारण, भारतीय स्त्रियांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा सर्वत्र उमटवला आहे. भारतीय संस्कृती म्हणजे अनेक परंपरांचा संगम आहे. गुरु-शिष्य परंपरा ही त्यापैकीच एक आहे.’

कनि मंचतर्फे महिलांसाठी कोरोना काळातील ‘२४ तास घरात’ ही निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. ऐश्वर्या राहुरकर, सुचेता वैद्य, प्रतिभा जाधव, संयोगिता पाळंदे या विजेत्यांचा अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. योगेश ठीक यांनी आभार मानले.

Web Title: Dr. without question of women's performance. Sadanand More: Guru Gaurav Award by Kani Mahila Manch