शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

Dr. Shriram Lagoo's Funeral : डाॅ. श्रीराम लागू अनंतात विलीन ; मान्यवरांनी वाहिली आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 14:30 IST

Dr. Shriram Lagoo's Funeral : डाॅ. श्रीराम लागू यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.

पुणे : रंगभूमीवरील नटस्रमाट डाॅ. श्रीराम लागू यांच्यावर शासकीय इतमामात पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमिमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुभाष देसाई, दिग्दर्शक जब्बार पटेल, अभिनेत्री उर्मिला माताेंडकर तसेच चित्रपट- नाट्यसृष्टीतील अनेक मान्यवर, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित हाेते. 

मंगळवारी रात्री डाॅ. श्रीराम लागू यांचे पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या जाण्याने चित्रपट- नाट्यसृष्टीत एकप्रकारे पाेकळी निर्माण झाली. त्यांचा मुलगा आनंद हा अमेरिकेवरुन येणार असल्याने त्यांचे पार्थिव दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ठेवण्यात आले हाेते. त्यांचा मुलगा अमेरिकेवरुन परतल्यानंतर आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पुर्वी बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले हाेते. मनसे प्रमुख राज ठाकरे, अभिनेते नाना पाटेकर, दिग्दर्शक अमाेल पालेकर, खासदार गिरीष बापट, महापाैर मुरलीधर माेहाेळ आदींनी यावेळी लागूंना आदरांजली वाहिली.

लागूंना आदरांजली वाहताना सुभाष देसाई म्हणाले, लागू यांनी मराठी रंगभूमीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. शतकात असा कलाकार हाेणार नाही. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक कलाकार चित्रपट आणि नाट्यसृष्टीत उदयाला आले. ही प्रेरणा सातत्याने नव्या पिढीला मिळत राहील याची मला खात्री आहे. त्यांनी साकारलेल्या भूमिका विसरता येणे शक्य नाही. 

उर्मीला माताेंडकर म्हणाल्या,  माझं चित्रपटसृष्टीतील पदार्पण डाॅ. लागूंमुळे झालं. मी 7 वर्षाची असताना त्यांनी त्यांच्या एका चित्रपटात काम करण्याची संधी दिली. त्यावेळी माझे काम पाहून ते म्हणाले हाेते की ही एक दिवस माेठी अभिनेत्री हाेईल. मी त्यांची ऋणी आहे. ते एक कलाकार म्हणून जितके महान हाेते, तितके ते एक माणूस आणि विचारवंत म्हणून देखील महान हाेते. त्यांच्या विचारांवर ते कायम ठाम राहिले. 

जब्बार पटेल म्हणाले, डाॅ. हे रंगभूमीवरचे नट हाेते. रंगभूमीवर त्यांनी जे केले ते खूप अभ्यासपूर्वक हाेते. कुठल्याही भूमिकेला सामाेरे जाताना ते व्यक्तिरेखा समजून खाेलवर जात ते काम करत असायचे. त्यांनी केलेल्या भूमिका नेहमीच सगळ्यांपेक्षा वेगळ्या वाटतात. नटसम्राट हा त्यांच्या नाटकाच्या सगळ्या प्रतिभेचा उच्चांक हाेता. त्यांनी म्हंटलेलं स्वगत अजरामर आहेत. सिनेमात त्यांच मन फार रमलं नाही परंतु त्यांनी केलेल्या सिनेमामध्ये त्यांनी रंगभूमिवरची आंतरिक ताकद लावून त्या उत्तम पद्धतीने साकार केल्या. 

टॅग्स :PuneपुणेShriram Lagooश्रीराम लागूDeathमृत्यू