शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

डॉ. शैलेंद्र देवळाणकर नवे उच्च शिक्षण संचालक; डॉ. धनराज माने यांची गच्छंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 15:19 IST

याचा शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जारी केला आहे...

पुणे : मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांची उच्च शिक्षण संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधीचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने हे वैद्यकीय दृष्ट्या अपात्र ठरल्याने त्यांची गच्छंती करण्यात आली असून त्यांच्याकडे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संदर्भात (असंख्य पद) जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या बाबतचा शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जारी केला आहे.

याआधी धनराज माने यांच्याकडे उच्च शिक्षण संचालनालयाचा पदभार होता. मात्र, त्यांना दृष्टीदोष निर्माण झाल्याने त्यांच्याकडून हे पद काढून घेतले जावे त्यासाठी 'कॉप्स' सह काही संघटनांनी मागणी केली होती. यानंतर माने यांच्या डोळ्यांची तपासणी मुंबईच्या जे.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आली. त्यामध्ये त्यांची दृष्टी कमी झाल्याचे आढळून आले. त्यांना एका डोळ्याने १० टक्केच दिसते. त्यामुळे या पदावर ते कार्यरत राहण्यास सक्षम नाहीत असा अहवाल डॉक्टरांनी दिला होता. म्हणजेच ते वैद्यकीय दृष्ट्या पात्र ठरले नाहीत. त्यामुळे त्यांना हटवले जावे याबाबत मागणी केली जात होती. त्यामुळे शासनाने माने यांची उचल बांगडी केली. 

कोण आहेत डॉ. शैलेंद्र देवळाणकर?

नवनियुक्त उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर हे गेल्या दोन दशकांपासून आंतरराष्ट्रीय संबंध आणि परराष्ट्र धोरण विषयावरील राष्ट्रीय ख्यातीचे संशोधक, विश्लेषक आणि स्तंभलेखक आहेत. ते पुणे विद्यापीठातील एम. ए. (राज्यशास्त्र) मध्ये सुवर्णपदक विजेते आहेत. डॉ. देवळाणकर यांनी प्रतिष्ठित स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली येथून एमफिल आणि पीएचडी केली आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंध आणि परराष्ट्र धोरण विषयांवर 20 पुस्तके लिहिली आहेत. नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये संशोधन लेख प्रकाशित केले आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEducationशिक्षण