डॉ. संचेती यांना पुण्यभूषण
By Admin | Updated: March 23, 2017 02:27 IST2017-03-23T02:27:28+5:302017-03-23T02:27:28+5:30
पुण्यभूषण फाउंडेशन (त्रिदल, पुणे) आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा २०१७ साठीचा पुण्यभूषण पुरस्कार डॉ. के. एच. संचेती

डॉ. संचेती यांना पुण्यभूषण
पुणे : पुण्यभूषण फाउंडेशन (त्रिदल, पुणे) आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा २०१७ साठीचा पुण्यभूषण पुरस्कार डॉ. के. एच. संचेती यांना वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी देण्यात येणार आहे.
एक लाख रुपये रोख आणि बाल शिवाजींची सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरित असलेली प्रतिमा, पुण्याच्या ग्राम देवतांसह असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण स्मृतिचिन्हाने त्यांना गौरविले जाणार आहे, अशी माहिती पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी दिली. पुरस्काराचे यंदा २९वे वर्ष आहे. पुरस्कारासोबत पाच ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांनही गौरविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)