शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्य वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार; आदित्य ठाकरेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 16:17 IST

येरवडा येथील डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्य बचाव समितीच्या वतीने पाठपुरावा करून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना अभयारण्य परिसराची पाहणी करण्याची विनंती करण्यात आली होती

येरवडा: पक्ष्यांना सुरक्षित अधिवास मिळण्याच्या दृष्टीने महसूल विभागाकडील येरवड्यातील डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्य परिसरातील क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.  येरवडा येथील डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्य बचाव समितीच्या वतीने पाठपुरावा करून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना अभयारण्य परिसराची पाहणी करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी रविवारी सकाळी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली यावेळी ते बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, "डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य परिसरातील पक्षी आणि वन्यजीवांना सुरक्षितता अधिवास मिळणे गरजेचे आहे. तसेच अभयारण्य परिसरातील अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार असून संरक्षणाच्या दृष्टीने परिसरात पोलिसांची गस्त देखील वाढविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. राज्यातील वने वाचविण्यासाठी राज्यशासन मोठ्या प्रमाणात कार्य करीत आहे. पुणेकर नागरिक पर्यावरणाबाबत अधिक जागरूक असून त्यांच्या सहकार्याने पुण्याला २०३०पर्यंत "कार्बन न्यूट्रल" शहर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. 

''अभयारण्य परिसरातील स्वच्छतेसाठी पुणे महापालिकेने स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवावेत. नागरिकांनी या ठिकाणी भेटी देऊन पर्यावरणाच्या दृष्टीने या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करावी असे आवाहन यावेळी पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी केले.''  

यावेळी विधान परिषदेच्या  उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार सुनील टिंगरे, माजीमंत्री सचिन अहिर, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मनपा आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, उपवनसंरक्षक राहुल पाटील, अतिरिक्त मनपा आयुक्त राहुल खेमनार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अभयारण्य बचाव समिती सदस्य व महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी अभयारण्य परिसरात होत असलेल्या विविध कामांची माहिती दिली.

टॅग्स :Yerwadaयेरवडाforest departmentवनविभागforestजंगलAditya Thackreyआदित्य ठाकरे