Dr Salim Ali Bird Sanctuary: अभयारण्याच्या आवारातील नाल्यामध्ये राडारोडा टाकल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 07:03 PM2021-11-21T19:03:56+5:302021-11-21T19:04:25+5:30

डॉ.सलीम अली अभयारण्याच्या आवारातील दुरवस्थेबाबत डॉ. सालिम आली अभयारण्यांना बचाव कृती समितीच्या वतीने राज्यशासन तसेच महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या

Dr Salim Ali Bird Sanctuary | Dr Salim Ali Bird Sanctuary: अभयारण्याच्या आवारातील नाल्यामध्ये राडारोडा टाकल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

Dr Salim Ali Bird Sanctuary: अभयारण्याच्या आवारातील नाल्यामध्ये राडारोडा टाकल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

googlenewsNext

येरवडा : पुणे महापालिकेच्या येरवडा येथील ग्रीन झोन मध्ये असलेल्या डॉ. सलीम अली अभयारण्याच्या आवारातील नाल्यामध्ये राडारोडा मुरूम व माती टाकल्याप्रकरणी पुणे महापालिकेच्या सातत्य विभागाच्या वतीने येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 च्या कलम 52 अनुसार तपती विभागाचे कनिष्ठ अभियंता कश्यप सुधाकर वानखेडे यांनी येरवडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी मिलिंद गायकवाड (रा.कल्यानीनगर फ्लॅट क्रमांक 3 येरवडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ.सलीम अली अभयारण्याच्या आवारातील दुरवस्थेबाबत डॉ. सालिम आली अभयारण्यांना बचाव कृती समितीच्या वतीने राज्यशासन तसेच महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानुसार अतिरिक्त महापालिका आयुक्त कुणाल खेमनार यांनी स्वतः अभयारण्याला भेट देऊन पाहणी केली असता ग्रीनझोनच्या जागेवर राडारोडा टाकून नाल्याचा प्रवाह बुजवण्याचे काम सुरू होते. याप्रकरणी अतिरिक्त महापालिका आयुक्त यांनी संबंधित जागा मालक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना स्थापत्य विभागाला दिल्या होत्या. 

त्यानुसार अभयारण्याच्या आवारातील नाले लागत व नाल्यांमध्ये राडारोडा व माती टाकणारे इसम मिलिंद गायकवाड यांच्या विरुद्ध बांधकाम विकास विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 52 नुसार गुन्हा दाखल करणे बाबत लेखी तक्रार पोलिस स्टेशन येथे देण्यात आली होती. त्यानुसार येरवडा पोलीस स्टेशन येथे संबंधित व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. डॉ. सालीम अली अभयारण्यात बचाव समितीच्या वतीने या प्रकरणी शासनाकडे करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यानिमित्ताने यश आल्याचे म्हटले जात आहे. आगामी काळात अभयारण्याच्या परिसरातील सुरक्षितता तसेच इतर आवश्यक उपाययोजनांसाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे यानिमित्ताने सांगण्यात आले.

Web Title: Dr Salim Ali Bird Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.