इंदापूर येथे साहित्यरत्न डाॅ. अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:08 IST2021-07-19T04:08:36+5:302021-07-19T04:08:36+5:30

रविवारी इंदापूर शहरात श्रीराम चौक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठेनगर येथे स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले. सुरुवातीला श्रीराम चौक येथील ...

Dr. Sahityaratna at Indapur. Greetings to Anna Bhau Sathe | इंदापूर येथे साहित्यरत्न डाॅ. अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

इंदापूर येथे साहित्यरत्न डाॅ. अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

रविवारी इंदापूर शहरात श्रीराम चौक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठेनगर येथे स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले. सुरुवातीला श्रीराम चौक येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर साठेनगर येथे इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा व प्रभागाच्या नगरसेविका राजश्री अशोक मखरे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या वेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, माजी नगरसेवक, दादासाहेब सोनवणे, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, सुधीर मखरे, माजी नगराध्यक्ष विठ्ठलअप्पा ननवरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. धर्मवीर संभाजी मित्र मंडळाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

या वेळी साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांना धर्मवीर संभाजी मित्र मंडळाच्या वतीने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, विनायक बाब्रस, आण्णा ढावरे, दादा सोनवणे, अनिल चव्हाण, किरण गायकवाड, मनोज भापकर, रमेश बनसोडे, सुनील दुधनकर, गणेश गोरे, बाळू अडसूळ, प्रशांत सिताप, ललेंद्र शिंदे, चंदू सोनवणे, तशू सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Dr. Sahityaratna at Indapur. Greetings to Anna Bhau Sathe