डॉ. आंबेडकर वसाहतीतील ३०५ घरांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:09 IST2020-12-09T04:09:07+5:302020-12-09T04:09:07+5:30
डॉ. आंबेडकर वसाहतीत नागरिक १९९५ पासून राहत आहेत. मात्र त्यांच्या घरांची नोंदणी महापालिकेत केली नसल्याने कर भरता येत नव्हता. ...

डॉ. आंबेडकर वसाहतीतील ३०५ घरांची नोंदणी
डॉ. आंबेडकर वसाहतीत नागरिक १९९५ पासून राहत आहेत. मात्र त्यांच्या घरांची नोंदणी महापालिकेत केली नसल्याने कर भरता येत नव्हता. खराडीतील सामाजिक कार्यकर्ते संतोष भरणे यांच्या सहकार्याने महापालिकेत घरांची नोंदणी करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना वसाहतीत राहत असून माहापालिकेचे कर दाते झाल्याचा दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी अनेक सोयी सुविधांचा अभाव जाणवत होता. आता कर दाते झाल्याने हक्काने सुविधा मागता येणे शक्य होणार आहे. असा विश्वास पूजा शर्मा, दिलीप नवगिरे, मंगल गणवीर, रॉबर्ट बनसोडे आदी नागरिकांनी व्यक्त केला.
महापालिकेत घरांची नोंदणी केल्याने येथील नागरिकांनी भरणे यांचे आभार मानले. यावेळी राजेंद्र पठारे उपस्थित होते. भरणे म्हणाले की, येथील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. आवश्यक कागदपत्रे सादर करून त्यांच्या घरांची नोंद केल्याने त्यांना आता कर भरता येईल. करदाते झाल्याने नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. येत्या काही दिवसांत दीडशेहुन अधिक नागरिकांच्या घरांची नोंदणी करण्यात येणार आहे.”