शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. राजा दीक्षित यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 21:26 IST

विश्वकोशाच्या माध्यमातून ज्ञानाचे लोकशाहीकरण करण्यावर भर असेल : डॉ. राजा दीक्षित

पुणे  : ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ आणि विचारवंत डॉ. राजा दीक्षित यांची राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी गुरुवारी नियुक्ती करण्यात आली. विश्वकोश निर्मिती मंडळाच्या सदस्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. आधीचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. 

डाॅ. राजा दीक्षित हे इतिहासाचे गाढे अभ्यासक असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. ',दोन वर्षांपूर्वी रा.ना.चव्हाण प्रतिष्ठानतर्फे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्काराने मला वाई येथे सन्मानित करण्यात आले होते. नुकतीच वाईच्या प्राज्ञ पाठशाळेच्या नवभारत मासिकाचे संपादकपदही स्वीकारले आहे. आता विश्वकोशाच्या निमित्ताने वाईशी जुळलेले ऋणानुबंध वृद्धिंगत झाले आहेत', अशा भावना डॉ. दीक्षित यांनी व्यक्त केल्या.

ते म्हणाले, 'विश्वकोश आणि ज्ञानकोश ही ज्ञानाच्या लोकशाहीकरणाची साधने आहेत. त्यांचे सामाजिक पातळीवरील महत्त्व निरंतर आहे. विश्वकोशाला खूप प्राचीन आणि समृद्ध परंपरा आहे. तर्कतीर्थ लक्षमणशास्त्री जोशी, मे. पु. रेगे, प्रा. रा. ग. जाधव यांच्यासारख्या विद्वानांचा वारसा पुढे नेण्याची  जबाबदारी माझ्याकडे आली आहे. तिघांविषयी मला नितांत आदर आहे. २७ मे हा तर्कतीर्थ लक्षमणशास्त्री जोशी यांचा स्मृतीदिन आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वर्धापनदिन. साहित्य परिषदेत दीपप्रजवलनासाठी गेलो असताना म.श्री.दीक्षित पायरीचे दर्शन घेऊन आलो आणि जणू वडिलांचे आशीर्वादही मिळाले, हा विलक्षण योगायोग आहे.'

-----विश्वकोश, ज्ञानकोश ही अभ्याससाधने आहेत. त्यांना कधीच पूर्णविराम नसतो. विश्वकोश ही प्रवाही प्रक्रिया आहे. विश्वकोषाचे २० खंड प्रकाशित झाले असले तरी जुन्या नोंदींची फेररचना, काळाच्या ओघात कराव्या लागणाऱ्या दुरुस्ती, नव्या नोंदींची भर हे काम अव्याहतपणे सुरूच राहणार आहे. नवतंत्रज्ञान, जागतिकीकरणाच्या युगात विश्वकोषामध्ये नव्या युगाचा संदर्भ महत्वाचा असतो. अभ्यास साधनांचे सामाजिक संदर्भातील मूल्य मोठे असते. आजवर ज्ञानापासून वंचित राहिलेल्या घटकांपर्यंत विश्वकोश पोहोचावा, यासाठी प्रयत्न करेन.

- डॉ. राजा दीक्षित, अध्यक्ष, विश्वकोश निर्मिती मंडळ

टॅग्स :PuneपुणेState Governmentराज्य सरकारliteratureसाहित्यcultureसांस्कृतिकmarathiमराठी