पुणे विभागीय माहिती उपसंचालकपदी डॉ. राजू पाटोदकर यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:14 IST2021-09-16T04:14:43+5:302021-09-16T04:14:43+5:30
पुणे : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुणे विभागीय माहिती उपसंचालकपदी डॉ. राजू पाटोदकर यांची मंत्रालयातून नियुक्ती झाली आहे. ...

पुणे विभागीय माहिती उपसंचालकपदी डॉ. राजू पाटोदकर यांची नियुक्ती
पुणे : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुणे विभागीय माहिती उपसंचालकपदी डॉ. राजू पाटोदकर यांची मंत्रालयातून नियुक्ती झाली आहे. त्यांनी उपसंचालक पदाचा कार्यभार बुधवारी स्वीकारला.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे व प्रदर्शन सहायक निलीमा आहेरकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. माहिती अधिकारी दत्तात्रय कोकरे, माहिती सहायक संदीप राठोड, दूरमुद्रण चालक विलास कसबे, ज्ञानेश्वर कोकणे, टंकलेखक स्वाती साळुंके, सुहास सत्वधर, मिलिंद भिंगारे, साऊंड रेकाॅर्ड सिटीम संजय गायकवाड, कॅमेरा सहायक संतोष मोरे, छायाचित्रकार चंद्रकांत खंडागळे, वाहनचालक मोहन मोटे, विलास कुंजीर, जितेंद्र खंडागळे, सुनील झुंजार, संजय घोडके, रोनिओ ऑपरेटर रावजी बाबंळे, शिपाई पांडुरंग राक्षे, विशाल तामचीकर, मीरा गुथालिया आदी उपस्थित होते.
डॉ. पाटोदकर हे १९९९ पासून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात कार्यरत आहेत. यांनी यापूर्वी कोकण विभागीय माहिती कार्यालयात सहायक संचालक, रत्नागिरी, रायगड जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी त्याचप्रमाणे मंत्रालयात जलसंपदा, गृह विभाग, आदिवासी विकास, सामाजिक न्याय, उच्च व तंत्रशिक्षण, उद्योग विभागांसाठी विभागीय संपर्क अधिकारी म्हणूनही काम केले.