मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. शमसुद्दीन तांबोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:16 IST2020-12-30T04:16:03+5:302020-12-30T04:16:03+5:30

पुणे : मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांची पुन्हा एकदा सर्वानुमते निवड करण्यात आली. डॉ. बेनझीर तांबोळी ...

Dr. as the President of the Muslim Truth Board. Shamsuddin Tamboli | मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. शमसुद्दीन तांबोळी

मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. शमसुद्दीन तांबोळी

पुणे : मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांची पुन्हा एकदा सर्वानुमते निवड करण्यात आली. डॉ. बेनझीर तांबोळी यांची मुस्लिम महिला मंचाच्या प्रमुख म्हणून निवड करण्यात आली.

मुस्लीम सत्यशोधक मंडळाची सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांचा कार्यकाल संपल्याने नवे पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांची निवड या सभेत करण्यात आली.

डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांच्यासह पुन्हा कार्यकारिणीत प्रा. सायरा मुलाणी (उपाध्यक्ष), प्रा.जमीर शेख (कार्यवाह), दिलावर शेख (खजिनदार), तमन्ना इनामदार (सहकार्यवाह) आणि अल्ताब हुसेन नबाब व जावेद शाह (कार्यकारिणी सदस्य) यांची निवड करण्यात आली. मंचाच्या कायदेविषयक सल्लागारपदी ऍड. तबस्सुम इनामदार यांची निवड झाली.

मुस्लीम सत्यशोधक पत्रिकेचे संपादक म्हणूनही डॉ. शमसुद्दीन तांबोळी हेच काम पाहतील. मुस्लीम सत्यशोधक मंडळाने ५१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. यावेळी मंडळाच्या कार्याचा आढावा घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवण्याबद्दल विविध निर्णय घेण्यात आले.

Web Title: Dr. as the President of the Muslim Truth Board. Shamsuddin Tamboli