शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. प्रदीप कुरूलकरच्या अडचणी वाढणार; महिलेशी विवाहबाह्य संबंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 09:34 IST

महिलेने तक्रार दिल्यास गुन्ह्यात एका किंवा त्यापेक्षा जास्त कलमांची वाढ होण्याची शक्यता

पुणे: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा संचालक (डीआरडीओ) डॉ. प्रदीप कुरूलकरच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. पाकिस्तानी हेर झारा दासगुप्ताशी ‘बेब’ म्हणून चॅटिंग करणाऱ्या कुरूलकरबाबत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. कुरूलकरचे एका महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याचे उघडकीस आले असून, दोघातले चॅटिंग तपास यंत्रणेला मिळाले आहे, असे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात नमूद केले आहे.

दरम्यान, याबाबत महिलेने अद्याप कोणतीही तक्रार दिलेली नाही. तिने तक्रार दिल्यास डॉ. कुरूलकर याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात एका किंवा त्यापेक्षा जास्त कलमांची वाढ होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी हेरांच्या जाळ्यात अडकून देशाच्या संरक्षण क्षेत्राशी निगडित गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपाखाली डॉ. कुरूलकर याला दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली. सध्या त्याला २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा एटीएसने केलेल्या तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून, पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या दोन हजार पानांच्या दोषारोपपत्रात त्या सर्व बाबींचा समावेश केला आहे. पाकिस्तानी हेर झारा दासगुप्ताशी ब्राह्मोस, अग्नी ६, सरफेस टू एअर मिसाइल यासंबंधीची चॅटिंगद्वारे माहिती पुरविल्याचे उघडकीस आल्यानंतर आता कुरूलकरचे एका महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याचे या प्रकरणी दाखल असलेल्या दोषारोपपत्रातून पुढे येत आहे. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) या प्रकरणात आतापर्यंत ७० हून अधिक जणांचे जबाब नोंदवून गोपनीय कागदपत्रे न्यायालयात सादर केली आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइमCourtन्यायालयscienceविज्ञानPakistanपाकिस्तान