शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. न. म. जोशी, डॉ. अनिल अवचट यांना मसाप जीवनगौरव जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 18:11 IST

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा 'मसाप जीवनगौरव पुरस्कार' साहित्यिक डॉ. न. म. जोशी (२०२०) आणि डॉ. अनिल अवचट (२०२१) यांना जाहीर झाला आहे.

डॉ. सुनीलकुमार लवटे, मोहन रेडगावकर यांना डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार जाहीर

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा 'मसाप जीवनगौरव पुरस्कार' साहित्यिक डॉ. न. म. जोशी (२०२०) आणि डॉ. अनिल अवचट (२०२१) यांना जाहीर झाला आहे. वाड्मयीन चळवळीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल परिषदेचा डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार डॉ. सुनीलकुमार लवटे, कोल्हापूर (२०२०) आणि मोहन रेडगांवकर, इंदूर (२०२१) यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.  मसापच्या ११५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

प्रा. जोशी म्हणाले, 'डॉ. न. म. जोशी आणि डॉ. अनिल अवचट यांना त्यांनी लेखनातून केलेल्या साहित्य सेवेबद्दल मसाप जीवनगौरव पुरस्कार तर डॉ. सुनीलकुमार लवटे आणि मोहन रेडगांवकर यांनी वाचन आणि साहित्य चळवळ गतिमान करण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी असलेल्या संपूर्ण टाळेबंदीमुळे परिषदेचा वर्धापनदिन जाहीरपणे साजरा होऊ शकला नाही. फक्त पदाधिकाऱ्यांनी यादिवशी दीपप्रज्वलन केले. यावर्षीही जाहीर कार्यक्रम करणे शक्य नाही. मसाप जीवनगौरव आणि डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार हे मसापचे दोन महत्त्वाचे पुरस्कार असून यावर्षी वर्धापन दिनानिमित्त हे पुरस्कार जाहीर केले आहेत.

गेल्या वर्षी आणि यावर्षी टाळेबंदीमुळे ग्रंथ आणि ग्रंथकार पुरस्कारांसाठी अनेक प्रकाशकांना आणि लेखकांना त्यांची पुस्तके पाठविता आली नाहीत. तसेच करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे परीक्षकांची समिती नियुक्त करणे, त्यांच्या बैठका होऊन त्यांनी पुरस्कारासाठी पुस्तकांची निवड करणे ही प्रक्रिया पार पाडणे शक्य झाले नाही. त्यामुळे करोना संसर्ग कमी होऊन परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठीची तसेच उत्कृष्ट शाखा व कार्यकर्ता पुरस्कारसाठीची  प्रक्रिया पार पाडून पुरस्कारांची घोषणा करण्यात येईल. सर्व पुरस्कार परिस्थिती अनुकूल असल्यास समारंभपूर्वक देण्यात येतील अन्यथा पोस्टाद्वारे ते घरपोच पाठविण्यात येतील. 

टॅग्स :Anil Avchatअनिल अवचटPuneपुणे