डॉ. आंबेडकर निबंध स्पर्धेत मनोहर मोहरे प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:08 IST2021-07-01T04:08:28+5:302021-07-01T04:08:28+5:30

युगप्रवर्तक प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३०व्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यातील खुल्या गटासाठी महामानवाची यशोगाथा ...

Dr. Manohar Mohare first in Ambedkar Essay Competition | डॉ. आंबेडकर निबंध स्पर्धेत मनोहर मोहरे प्रथम

डॉ. आंबेडकर निबंध स्पर्धेत मनोहर मोहरे प्रथम

युगप्रवर्तक प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३०व्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यातील खुल्या गटासाठी महामानवाची यशोगाथा व कोरोना महाभयंकर महामारी या विषयांवर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी आंबेगाव, जुन्नर, खेड, मुळशी, शिरूर, बारामती, दौंड, पुणे शहर या भागातून विविध क्षेत्रातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.. कोरोना संकट असल्याने स्पर्धेचा निकाल उशिरा लावण्यात आला अशी माहिती युगप्रवर्तक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गौतमराव खरात यांनी दिली.

या निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ चार स्पर्धकांची निवड केली आहे. त्यात आदर्श शिक्षिका मनीषा कानडे,क्रांती खंडागळे, साबळे विलास, रविना ठाकरे, तर सुंदर हस्ताक्षर म्हणून सिद्धी लोंढे जुन्नर व अर्चना कैलास डफळ धामारी, शिरूर यांची निवड करण्यात आली आहे.

Web Title: Dr. Manohar Mohare first in Ambedkar Essay Competition