डॉ.भा. ल.भोळे व डॉ. यशवंत सुमंत स्मृती पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:29 IST2020-12-04T04:29:27+5:302020-12-04T04:29:27+5:30
डॉ. यशवंत सुमंत कुटुंबियांच्या वतीने गेल्या वर्षापासून ज्येष्ठ अभ्यासकांसाठी जीवनगौरव पुरस्कार सुरु केला आहे. या पुरस्कारासाठी नागपूरचे ज्येष्ठ गांधीवादी ...

डॉ.भा. ल.भोळे व डॉ. यशवंत सुमंत स्मृती पुरस्कार जाहीर
डॉ. यशवंत सुमंत कुटुंबियांच्या वतीने गेल्या वर्षापासून ज्येष्ठ अभ्यासकांसाठी जीवनगौरव पुरस्कार सुरु केला आहे. या पुरस्कारासाठी नागपूरचे ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. सु. श्री. पांढरीपांडे यांची निवड केली आहे, अशी माहिती निवड समितीचे प्रमुख निमंत्रक ज्येष्ठ अभ्यासक किशोर बेडकिहाळ व दाते स्मृती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी दिली. डॉ. यशवंत सुमंत स्मृती युवा संशोधन प्रेरणा पुरस्कारासाठी भाषा शास्त्रातील तरुण अभ्यासक केरळ येथील डॉ. चिन्मय धारुरकर यांची निवड केली आहे.