शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

डॉ. जयंत नारळीकर यांचा दुर्मिळ ठेवा एनएफएआयकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:21 IST

जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ आणि ‘आयुका’ या खगोलशास्त्रीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी वैयक्तिक जीवनातील काही महत्त्वाची ‘क्षणचित्रे’ टिपणाऱ्या फिल्म एनएफएआयकडे सुपूर्त केल्या आहेत.

पुणे : चित्रपटप्रेमी मंडळींकडून स्वत:कडे असलेल्या दुर्मिळ चित्रपटांचा संग्रह, पोस्टर किंवा चित्रपटाशी संबंधित ठेवा जतन करण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला ( एनएफएआय) दिला जातो. मात्र जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ आणि ‘आयुका’ या खगोलशास्त्रीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी वैयक्तिक जीवनातील काही महत्त्वाची ‘क्षणचित्रे’ टिपणाऱ्या फिल्म एनएफएआयकडे सुपूर्त केल्या आहेत. सुमारे आठ एमएम आणि सुपर आठ एमएमच्या स्वरूपातील या फिल्म एकूण चार तासांच्या कालावधीच्या आहेत.डॉ. जयंत नारळीकर आणि त्यांच्या पत्नी मंगला नारळीकर यांनी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला नुकतीच भेट देऊन आपला हा अनमोल खजिना संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांच्याकडे स्वाधीन केला. डॉ. नारळीकर यांनी दिलेल्या सुमारे ४१ छोट्या फिल्ममध्ये प्रामुख्याने त्यांच्या अमेरिका, इंग्लंड आदी देशांच्या भेटी तसेच केंब्रिज विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील वास्तवाचा काळ चित्रित करण्यात आला आहे. याशिवाय काही फिल्ममध्ये त्यांच्या कौटुंबिक जीवनातील महत्त्वाच्या कार्यक्रमांचा तसेच त्यांच्या तिन्ही मुलींच्या बालपणाच्या गमती-जमती आदी गोष्टींचा अंतर्भाव आहे. विशेष म्हणजे डॉ. नारळीकर व मंगला नारळीकर यांनीच या सर्व फिल्मचे चित्रीकरण केले आहे. या फिल्मचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे डॉ. जयंत नारळीकर यांच्या मातोश्री सुमती नारळीकर आणि वडील डॉ. विष्णू वासुदेव नारळीकर यांचेही काही दुर्मिळ क्षण चित्रित करण्यात आलेआहेत.नारळीकरांचे वडील डॉ. विष्णू वासुदेव नारळीकर हे बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागाचे प्रमुख होते. कालांतराने त्यांची राजस्थान लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती. एका फिल्ममध्ये मातोश्री सुमती नारळीकर यांचे सतारवादन तसेच अजमेर शहराच्या बाहेर स्वत: मोटार ड्रायव्हिंग करत त्यांनी मारलेला फेरफटका याचे दर्शन घडते. तर दुसºया फिल्ममध्ये १९६६मध्ये पार पडलेला डॉ. जयंत नारळीकर आणि मंगला नारळीकर यांचा विवाहसोहळा चित्रित केला आहे. काही फिल्ममध्ये नारळीकर कुटुंब राजस्थानात असताना त्यांच्या घरी झालेले हत्तीचे आगमन तसेच नारळीकर कुटुंबांच्या आग्रा, दिल्ली, अजमेर आणि मुंबई आदी शहरांतील भेटीदरम्यानचे काही महत्त्वाचे प्रसंग पाहायला मिळतात.आंतरराष्ट्रीय पातळीवरील एका खगोलशास्त्रज्ञाच्या वैयक्तिक जीवनातील फिल्मच्या स्वरूपातील क्षणचित्रे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे उपलब्ध झाली आहेत याचा आनंद आहे.- प्रकाश मगदूम, संचालक राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयमाझ्या जीवनातील कौटुंबिक तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातील महत्त्वाचे प्रसंग चित्रित करण्यात आल्याने या फिल्मचे महत्त्व फार मोठे आहे.- डॉ. जयंत नारळीकर, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ

टॅग्स :Jayant Narlikarजयंत नारळीकरPuneपुणे