डॉ. मलघे यांच्या ग्रंथास डॉ. फडकुले पुरस्कार, गिरीश प्रभुणे यांना जीवनगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:26 IST2021-01-08T04:26:49+5:302021-01-08T04:26:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे दिला जाणार यंदाचा डॉ. निर्मलकुमार फडकुले पुरस्कार ज्येष्ठ ...

Dr. Dr. Malghe's book. Fadkule Award, Lifetime Achievement to Girish Prabhune | डॉ. मलघे यांच्या ग्रंथास डॉ. फडकुले पुरस्कार, गिरीश प्रभुणे यांना जीवनगौरव

डॉ. मलघे यांच्या ग्रंथास डॉ. फडकुले पुरस्कार, गिरीश प्रभुणे यांना जीवनगौरव

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे दिला जाणार यंदाचा डॉ. निर्मलकुमार फडकुले पुरस्कार ज्येष्ठ लेखक व इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांच्या ‘आचार्य दर्शन’ या ग्रंथास जाहीर झाला. जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे यांची निवड करण्यात आली.

याशिवाय प्रा. जे. पी. देसाई यांच्या ‘माझी भाषणे प्रसंग आणि आठवणी’ ग्रंथास साहित्य पुरस्कार, श्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांना सांस्कृतिक पुरस्कार दिला जाणार आहे. सभेचे कार्याध्यक्ष सचिन इटकर व अध्यक्ष उद्धव कानडे यांनी ही माहिती दिली. येत्या १० जानेवारीला पत्रकार भवनात सकाळी ११ वाजता पुरस्कार प्रदान सोहळा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते होणार आहे.

Web Title: Dr. Dr. Malghe's book. Fadkule Award, Lifetime Achievement to Girish Prabhune