शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपींना यूएपीए कायदा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 02:39 IST

न्यायालयात अर्ज : दोषारोपपत्रासाठी मुदतवाढ द्यावी

पुणे : अंधश्रध्दा निमूर्लन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात बेकायदा प्रतिबंधक हालचालीचे कलम (यूएपीए) वाढविण्यात यावे, असा अर्ज केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआयने) न्यायालयात दाखल केला आहे. नव्याने अटक करण्यात आलेल्या आरोपींवर पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यासाठीही सीबीआयने न्यायालयाकडे मुदतवाढीची मागणी केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांच्या न्यायालयात याबाबत अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

२० आॅगस्ट २०१३ रोजी सकाळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती. हत्येच्या आरोपावरून सुरुवातील मनीष नागोरी आणि खंडेलवाल यांना अटक करण्यात आली होती. परंतु, त्यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न न झाल्याने त्यांच्या विरोधात आरोपपत्रही दाखल झाले नाही. गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर सीबीआयने सनातचा साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला अटक करून आरोपपत्र दाखल केले होते. तावडे हा याप्रकरणील मुख्य सूत्रधार असल्याचा दावा त्यात करण्यात आला होता. तपास सुरू असताना सीबीआयने आॅगस्ट महिन्यात सचिन अंदुरे, अमित दिगवेकर, राजेश बंगेरा आणि अमोल काळे यांना अटक केली होती.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या कट कोणी रचला, त्यांच्यावर कोणी गोळ्या झाडल्या, शस्त्र कोणी पुरवले, ठिकाणाची रेकी कोणी केली, आरोपींना पळून जाण्यास कोणी मदत केली, अशी तपासाची पूर्ण थेअरी आता स्पष्ट झाली आहे. त्यानुसार आरोपींच्या विरोधात पुरावे शोधण्याचे आव्हान सीबीआयपुढे आहे. तपासादरम्यान हाती आलेल्या बाबींच्या अनुषंगाने आरोपींकडे तपास करण्यात येत आहे. दरम्यान याप्रकरणात यूएपीएचे कलम अंतर्भूत करण्यासाठी व पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाकडे मुदत मागण्यात आली आहे.सीबीआयने डॉ. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात यूएपीएचे कलम १५ अंतर्भूत करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आहे. यूएपीएच्या मागे राजकीय कारण असून या खटल्याची सुनावणी सुरू होण्यास मुद्दाम उशीर करण्यात येत आहे. खटला रोज चालल्यास मतदानावरही याचा परिणाम होईल, अशी शासनाला भीती आहे. त्यामुळे अशा पद्धतीने कारवाई केली जात आहे.- अ‍ॅड. धर्मराज चंडेल,बचाव पक्षाचे वकील 

टॅग्स :PuneपुणेNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरCourtन्यायालय