शहरात वाहतुकीचा बोजवारा
By Admin | Updated: August 5, 2014 23:39 IST2014-08-05T23:39:53+5:302014-08-05T23:39:53+5:30
सलग पडणारा मुसळधार पाऊस, त्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी निर्माण झालेले खड्डे, अनेक चौकांमधील बंद पडलेले सिगAल यांमुळे शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला.

शहरात वाहतुकीचा बोजवारा
पुणो : सलग पडणारा मुसळधार पाऊस, त्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी निर्माण झालेले खड्डे, अनेक चौकांमधील बंद पडलेले सिगAल यांमुळे शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला. आज दिवसभर शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत छोटय़ा रस्त्यांवरही वाहतूककोंडी
होती. सायंकाळी या कोंडीने तीव्र
रूप धारण केले. त्यामुळे पूर्ण शहरच आज दिवसभर मंदावले होते.
जंगली महाराज रस्ता, शास्त्री रस्ता, टिळक रस्ता, फग्यरुसन रस्ता, गणोशखिंड रस्ता, सेनापती बापट रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, सातारा रस्ता, हडपसर रस्ता, बंडगार्डन रस्ता, नगर रस्ता, जुना पुणो-मुंबई महामार्ग आदी रस्त्यांवर आज सकाळपासून
वाहतूक मंदावली होती. अनेक चौकांमध्ये सिगAलच सुरू नसल्याने आणि वाहतूक पोलीसही उपस्थित नसल्याने वाहतूककोंडी झाली होती. त्यात आज शहराच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडला. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली होती.
गेल्या 15 दिवसांपासून शहरात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे अनेक रस्त्यांवरील डांबर वाहून
गेले असून, ठिकठिकाणी खड्डे
पडले आहेत. त्यामुळे अनेक
ठिकाणी खड्डय़ांचे साम्राज्य
पसरल्याने त्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
सायंकाळी कार्यालये सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांच्या गाडय़ांमुळे शहरातील वाहतूककोंडीने तीव्र रूप धारण
केले. जंगली महाराज रस्ता,
कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, लॉ
कॉलेज रस्ता आदी रस्ते पार
करताना 2क् ते 3क् मिनिटे लागत
होती.(प्रतिनिधी)